घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तैसें सकळार्थभरित । तत्त्व सांगावें उचित । परी बोधे माझें चित्त । जयापरी ॥
त्याचप्रमाणे सर्व अर्थाने परिपूर्ण व (आचरण्यास) योग्य असे तत्त्व आपण सांगा; पण ज्या रीतीने माझ्या मनाला त्याचा पूर्ण बोध होईल त्या रीतीने सांगा.
देवा तुजऐसा निजगुरु । आजि आर्तीधणी कां न करूं । एथ भीड कवणाची धरूं । तूं माय आमुची ॥
देवा, तुमच्यासारखा गुरू मला मिळाला असता आज मी माझ्या मनाची इच्छा का तृप्त करून घेऊ नये? या ठिकाणी मी भीड कोणाची धरावी? तू माझी माऊली आहेस!
हां गा कामधेनूचें दुभतें । दैवें जाहलें जरी आपैतें । तरी कामनेची कां तेथें । वानी कीजे? ॥
असे पहा की, दैवयोगाने कामधेनूचे दुभते प्राप्त झाल्यावर इच्छित मागण्यास का कमी करावे?
जरी चिंतामणी हाता चढे । तरी वांछेचें कवण सांकडें । कां आपुलेनि सुरवाडें । इच्छावें ना ॥
किंवा चिंतामणी हाती आल्यावर मग इच्छित वस्तू मागण्याचे संकट का पडावे? आपल्याला जे अपेक्षित असेल ते का मागू नये?
देखा अमृतसिंधूतें ठाकावें । मग ताहानाचि जरी फुटावें । तरी सायासु कां करावे । मागील ते? ॥
पहा की, अमृतसिंधूचे काठी उभे राहून अमृत न पिता जर तहानेने तरफडावे, तर मग अमृतसिंधूजवळ येण्याचे श्रम तरी का घ्यावे?
तैसा जन्मांतरी बहुतीं । उपासितां श्री लक्ष्मीपती । तूं दैवें आजि हातीं । जाहलासी जरी ॥
त्याचप्रमाणे हे कमलापते, तुझी जन्मोजन्मी उपासना करिता करिता दैवयोगाने तू लाभला आहेस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -