घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

वाचासिद्धि पावाल । आज्ञापक होआल । म्हणिये तुमतें मागतील । महाऋद्धि ॥
वाणीने बोलाल ते सिद्ध होईल आणि तुम्ही दुसर्‍यांना आज्ञा करणारे व्हाल व महाऋद्धि नेहमी तुमच्या आज्ञेत राहून ‘सेवा घ्या’ असे म्हणतील.
जैसें ऋतुपतीचें द्वार । वनश्री निरंतर । वोळगे फळभार । लावण्येसी ॥
वसंत ऋतूचे दारात ज्याप्रमाणे वनशोभा आपल्या फलपुष्पभाराच्या लावण्याने निरंतर वास करिते,
तैसें सर्व सुखेंसहित । दैवचि मूर्तिमंत । येईल देखा काढत । तुम्हांपाठीं ॥
त्याप्रमाणे तुम्ही जेथे असाल तेथे सर्व सुखांसह मूर्तिमंत देवच तुमचा शोध घेत येईल.
ऐसें समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त । जरी स्वधर्मेंनिरत । वर्ताल बापा ॥
बाबानो ! जर तुम्ही एकनिष्ठेने स्वधर्माचे आचरण कराल, तर तुम्ही ऐश्वर्ययुक्त होऊन तुम्हाला कसलीही इच्छा राहणार नाही.
कां जालिया सकळ संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा । लुब्ध होऊनियां स्वादा । विषयांचिया ॥
सर्व संपत्ती प्राप्त झाली असता विषयसेवनाच्या गोडीला लंपट होऊन इंद्रियाच्या स्वैरवर्तनास अनुमोदन देईल.
तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ती दिधली पुरी । तयां स्वधर्मीं सर्वेश्वरीं । न भजेल जो ॥
यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवाने जी ही आपल्यास पूर्ण संपत्ती दिली आहे, त्या संपत्तीने व स्वधर्माचरणाने जो ईश्वरास भजणार नाही,
अग्निमुखीं हवन । न करील देवतापूजन । प्राप्तवेळे भोजन । ब्राह्मणाचें ॥
जो अग्नीत आहुती देणार नाही, देवतापूजन करणार नाही, यथाकाली ब्राह्मणास भोजन घालणार नाही,
विमुख होईल गुरुभक्ती । आदर न करील अतिथी । संतोष नेदील ज्ञाती । आपुलिये ॥
अथवा गुरुभक्तीला जो कंटाळेल, अतिथीचा आदरसत्कार करणार नाही व आपल्या जातीस संतोष देणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -