घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

येरां इंद्रियां विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस हटें । जें जीवन हें न घटे । येणेंविण ॥
इतर विषयाचे विषय कमी केले असता कमी होतात; पण त्याच प्रमाणात रसनेचा विषय हट्टाने कमी करता येत नाही; कारण यावाचून शरीर जिवंतच राहू शकत नाही.
मग अर्जुना स्वभावें । ऐसिही नियमातें पावे । जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाइजे ॥
परंतु अर्जुना जेव्हा साधक स्वानुभवाने परब्रह्म होऊन जातो, तेव्हा रसनेचेहि (रसना शब्दाने उपलक्षित वासना) सहज नियमन होऊ शकते.
तैं शरीरभाव नासती । इंद्रियें विषय विसरती । जैं सोहंभाव प्रतीति । प्रगट होय ॥
ज्या वेळी, आपण ब्रह्म आहो असा मनुष्यास अनुभव येतो, त्या वेळी शरीराचे व्यवहार बाधित (द्दढ मिश्यात्व निश्वय) होऊन इंद्रिये विषयांना विसरून जातात.
येर्‍हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना । जे राहटताती जतना । निरंतर ॥
अर्जुना, इंद्रियांना जिंकण्यासाठी जे नेहमी प्रयत्न करितात, त्यांच्यादेखील ही आधीन होत नाहीत.
जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी । जे मनातें सदा मुठी । धरूनि आहाती ॥
जो आपल्या भोवती अभ्यासाचे घरटे करून नियमांची ताटी करतो आणि मन सदा मुठीत बाळगतो,
तेही किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी । जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ॥
त्यालासुद्धा ही इंद्रिये व्याकुळ करून टाकतात. असा या इंद्रियांचा प्रताप आहे. ज्याप्रमाणे मांत्रिकाला जखीण भुलवून टाकते,
देखैं विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धीचेनि मिषें । मग आकळिती स्पर्शें । इंद्रियांचेनी ॥
त्याप्रमाणे हे विषय ऋद्धिसिद्धीच्या रूपाने योग्याला प्राप्त होऊन इंद्रियांद्वारा योग्याचे मन भ्रष्ट करितात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -