घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तिये संधी मन जाये । मग अभ्यासीं ठोठावलें ठाये । ऐसें बळिकटपण आहे । इंद्रियांचें ॥
अशा अडचणीत जर मन सापडले तर अभ्यास जागच्या जागी राहतो. अशी या इंद्रियांची शक्ती मोठी आहे!
म्हणौनि आइकें पार्था । यांतें निर्दळी जो सर्वथा । सर्व विषयीं आस्था । सांडूनियां ॥
म्हणून पार्था, सर्व विषयाची इच्छा सोडून इंद्रियांना जो स्वाधीन ठेवतो,
तोचि तूं जाण । योगनिष्ठेसी कारण । जयाचें विषयसुखें अंत:करण । झकवेना ॥
व ज्याचे अंतःकरण विषयाच्या सुखाने भुलून जात नाही, तोच योगनिष्ठा प्राप्त होण्यास योग्य आहे, असे जाण.
जो आत्मबोधयुक्तु । होउनि असे सततु । जो मातें हृदयाआंतु । विसंबेना ॥
कारण, तो नेहमी आत्मबोधाने युक्त होऊन राहतो व अंत:करणात मला कधी विसरत नाही.
एर्‍हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांहीं । तरी साद्यंतुचि पाहीं । संसारु असे ॥
एरवी, शब्दादी विषयांचा स्वीकार तर करीत नाहीच, पण मनात जर विषयांची थोडीशीही वासना असेल तर त्याला आरंभापासून शेवटपर्यंत सर्व संसार आहे, असे समज.
जैसा कां विषाचा लेशु । घेतलियां होय बहुवसु । मग निभ्रांत करी नाशु । जीवितासी ॥
थोडेसे विष जरी घेतले तरी ते संपूर्ण शरीरात पसरून जीवाचा निःसंशय नाश करिते,
तैसी विषयाची शंका । मनीं वसती देखा । घातु करी अशेखा । विवेकजाता ॥
त्याप्रमाणे चित्तांत विषयांची थोडी जरी इच्छा राहिली, तरी ती सर्व विचारसमूहाचा घात करिते !
जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती । संगें प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥
अंतःकरणात विषयाची नुसती आठवण झाली तरी विरक्तालाही त्याच्या प्राप्तीविषयी आसक्ती, म्हणजे काम उत्पन्न होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -