घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

इहीं आमुची वास पहावी । मग वर्ततीपरी जाणावी । ते लोककस्थिति आघवी । नासिली होईल ॥
वास्तविक संप्रदाय असा की, लोकांनी आमच्या वर्तनाकडे पाहून धर्माच्या वागणुकीचे प्रकार समजून घ्यावे. ही जी लोकांची रहाटी आहे, ती आम्ही धर्माचरण न केले तर बिघडून जाईल.
म्हणौनि समर्थु जो एथें । आथिला सर्वज्ञते । तेणें सविशेषें कर्मातें । त्यजावें ना ॥
म्हणून जो समर्थ व सर्वज्ञानसंपन्न असेल,त्याने विशेषेकरून कर्माचा त्याग कधीही करू नये.
देखैं फळाचिया आशा । आचरे कामुकु जैसा । कर्मींभरु होआवा तैसा । निराशाही ॥
फळाची इच्छा करणारा पुरुष ज्याप्रमाणे कर्माचरण करितो, त्याप्रमाणे ज्ञानवानानेही कर्माचरणावर विशेष भर दिला पाहिजे.
जे पुढतपुढतीं पार्था । हे सकळ लोकसंस्था । रक्षणीय सर्वथा । म्हणौनियां ॥
कारण, पार्था पुढे होणार्‍या लोकसमुदायाचे रक्षण करणे अवश्य आहे. म्हणून
मार्गाधारें वर्तावें । विश्व हें मोहरे लावावें । अलौलिका नोहावें । लोकांप्रति ॥
थोरांनी स्वतः सन्मार्गाने वागून लोकांनाही धर्माच्या मार्गास लावावे. परंतु सामान्य जनाला आपण कोणी अलौकिक पुरुष आहोत, असे भासवू नये.
जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी । म्हणौनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥
त्याचप्रमाणे कर्माचरणे करून चित्तशुद्धी होण्यापूर्वी त्यांना नैष्कर्म ब्रह्मस्थितीचेही ज्ञान सांगू नये. कारण, धनुर्धरा, जे मूल स्तनपानदेखील मोठ्या आयासाने करिते, ते पक्वान्ने कसे बरे खाणार? म्हणून त्याला ज्याप्रमाणे ती देऊ नयेत;
तैशीं कर्मीं जया अयोग्यता । तयांप्रति नैष्कर्म्यता । न प्रगटावी खेळतां । आदिकरुनी ॥
त्याप्रमाणे कर्माचरण करण्यासही जो अनधिकारी आहे, त्याला ज्ञानमार्गाची थोरवी थट्टेतसुद्धा सांगू नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -