घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आतां पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु । सांगैल तेथ पंडुसुतु । प्रश्नु करील ॥
आता यापुढे भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा सांगतील, ती ऐकून अर्जुन प्रश्न करील.
तया बोलाचा हन पाडु । कीं रसवृत्तीचा निवाडु । येणं श्रोतयां होईल सुरवाडु । श्रवणसुखाचा ॥
त्या कथेची योग्यता व रसिकपण ही ऐकून श्रोत्यांना श्रवणसुखाचा सुकाळ होईल.
ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा । चांग उठावा करूनि उन्मेषाचा । मग संवादु श्रीहरिपार्थांचा । भोगावा बापा ॥
निवृत्तीचे दास जे ज्ञानदेव, ते म्हणतात,‘बाबांनो, आत्मज्ञानप्राप्तीच्या चांगल्या तयारीने तुम्ही कृष्णार्जुनसंवाद ऐका.’
आजि श्रवणेंद्रिया पाहलें । जे येणें गीतानिधान देखिलें । आतां स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें ॥
आज कानांना उजाडले म्हणजे त्यांचा भाग्योदय झाला; कारण, यतार्थ गीता श्रवण होणे बहुतेक स्वप्नवत आहे! असा गीतेचा ठेवा आज त्यांनी पाहिला. आता जागृत झाल्यावर स्वप्नातील गोष्ट खोटी आहे असे भासते; पण ती आज खरी झाली!
आधींचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी । आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥
आधीच आत्मविचाराची गोष्ट, त्यात श्रीकृष्ण जगजेठी प्रतिपादन करणारा आणि भक्त शिरोमणी अर्जुन ऐकणारा.
जैसा पंचमालापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु । तैसा भला जाहला विनोदु । कथेचा इये ॥
पंचम स्वर आणि त्यातच उत्तम सुवास व गोडी या तिहींचा ऐक्यभाव असता जसा आनंद होईल, तसा प्रकार या गीतारूपी कथामृताचा आहे; म्हणजे यांत सर्व इंद्रियांना आनंद होईल, अशी गोडी आहे.
कैसी आगळिक दैवाची । जे गंगा जोडली अमृताची । हो कां जपतपें श्रोतयांचीं । फळा आलीं ॥
दैवाची थोरवी काय वर्णावी, की जिच्यामुळे श्रोत्यांची जपतपे फळास येऊन अमृतरूप गंगाच त्यांना प्राप्त झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -