Friday, March 21, 2025
27 C
Mumbai
Homeएज्युकेशनJEE Main 2025 Paper 2 Results : JEE Main 2025 पेपर 2 च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी जाहीर

JEE Main 2025 Paper 2 Results : JEE Main 2025 पेपर 2 च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी जाहीर

Subscribe

संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य जानेवारी सत्र 2025 पेपर 2 चा निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेने जाहीर केला आहे, ज्याची थेट लिंक आणि टॉपर्सच्या नावांची संपूर्ण माहिती जाहीर करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य जानेवारी सत्र 2025 पेपर 2 चा निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेने जाहीर केला आहे, ज्याची थेट लिंक आणि टॉपर्सच्या नावांची संपूर्ण माहिती जाहीर करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) मुख्य जानेवारी सत्र 2025 पेपर 2 चे निकाल जाहीर केले आहेत. जेईई मेन 2025 बार्च/बीप्लॅनिंग परीक्षेला बसलेले उमेदवार jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. (JEE Main 2025 Paper 2 Results Announced)

जेईई मेन जानेवारी सत्र 2025 पेपर 2 निकालाचा स्कोअरकार्ड तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकावा लागेल. निकालात BArch आणि BPlanning या दोन्ही पेपरमध्ये मिळालेले गुण समाविष्ट असतील. या वर्षी BArch मध्ये महाराष्ट्रातील पटना नील संदेश यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर बी प्लॅनिंगमध्ये सुनिधी सिंग या विद्यार्थीनीने अव्वल स्थान पटकावले आहे. एनटीए स्कोअर हे बहु-सत्रांच्या पेपर्समधील सामान्यीकृत स्कोअर आहेत आणि एका सत्रात परीक्षा दिलेल्या सर्वांच्या सापेक्ष कामगिरीवर आधारित आहेत. तर, पेपर 2 अ (बी.आर्क) साठी, महाराष्ट्रातील सिद्धी बांबल हीने अव्वल क्रमांक पटकावला आहे, या विद्यार्थीनीला 99.9977347 चा एनटीए स्कोअर मिळविण्यात यश मिळाले आहे. पेपर 2 बी (बी. प्लॅनिंग) मध्ये कर्नाटकचा ध्रुव राहुल पाठक हा पुरुष टॉपर आहे त्याला 99.9946225 एनटीए गुण मिळाले आहेत.

हेही वाचा… Australian Citizen : ऑस्ट्रेलियाच्या डोनाल्ड सॅम्सवर भारतात अंत्यसंस्कार, कारण काय?

या परीक्षेसाठी एकूण 63 हजार 481 उमेदवारांनी नोंदणी केली होती, ज्यात 30 हजार 755 महिला उमेदवार आणि 32 हजार 726 पुरुष उमेदवारांचा समावेश होता. नोंदणीकृत उमेदवारांपैकी 22 हजार 921 सर्वसाधारण प्रवर्गातील, 6 हजार 592 आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील, 7 हजार 779 ​​अनुसूचित जातीचे, 3 हजार 555 अनुसूचित जमातीचे आणि 22 हजार 634 इतर मागासवर्गीय प्रवर्गातील होते. याव्यतिरिक्त, 215 उमेदवार पीडब्ल्यूबीडी श्रेणीतील होते.

पेपर 2 अ (बी.आर्क) साठी एकूण 44 हजार 144 उमेदवार बसले होते. त्यापैकी 21 हजार 808 महिला आणि 22 हजार 336 पुरुष उमेदवार होते. श्रेणीनिहाय वितरणात सर्वसाधारण श्रेणीतील 15 हजार 307 विद्यार्थी, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील 4 हजार 754, अनुसूचित जातीचे 5 हजार 238, अनुसूचित जमातीचे 2 हजार 373 आणि इतर मागासवर्गीय वर्गातील 16 हजार 472 उमेदवारांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, 160 उमेदवारांनी पीडब्ल्यूबीडी श्रेणी अंतर्गत परीक्षा दिली. या परीक्षेसाठी एकूण 28 हजार 335 उमेदवारांनी नोंदणी केली होती, ज्यात 12 हजार 343 महिला उमेदवार आणि 15 हजार 992 पुरुष उमेदवार होते. नोंदणीकृत उमेदवारांपैकी 9 हजार 569 सर्वसाधारण प्रवर्गातील, 3 हजार 69 आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील, 3 हजार 918 अनुसूचित जातीचे, 1 हजार 652 अनुसूचित जमातीचे आणि 10 हजार 127 ओबीसी प्रवर्गातील होते. याव्यतिरिक्त, 131 उमेदवार पीडब्ल्यूबीडी श्रेणीतील होते.

JEE Main 2025 पेपर 2 चा निकाल असा पाहा…

  • जेईई मेनची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
  • वेबसाइटच्या होमपेजवर जेईई मेन २०२५ पेपर २ निकालाची लिंक निवडा.
  • लॉगिनसाठी तुमचा जेईई मेन अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि प्रदर्शित केलेला सुरक्षा पिन प्रविष्ट करा.
  • स्कोअरकार्ड स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रत प्रिंट करा.