Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeएज्युकेशनNEET UG 2025 : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, नीट यूजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जवळ आली

NEET UG 2025 : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, नीट यूजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जवळ आली

Subscribe

नीट यूजी परीक्षेचा फॉर्म भरण्यास इच्छुक उमेदवारांना त्यांची अर्ज प्रक्रिया लवकरच पूर्ण करावी लागणार आहे. कारण येत्या शुक्रवारी म्हणजे 7 मार्चला या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

नवी दिल्ली : नीट यूजी परीक्षेचा फॉर्म भरण्यास इच्छुक उमेदवारांना त्यांची अर्ज प्रक्रिया लवकरच पूर्ण करावी लागणार आहे. कारण येत्या शुक्रवारी म्हणजे 7 मार्चला या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर, शेवटच्या क्षणी अर्ज केल्याने कधीकधी सर्व्हर लोड पडण्याची शक्यता असते. ज्यामुळे अर्ज करताना तांत्रिक समस्या येऊ शकतात. म्हणून, कोणतीही समस्या टाळण्यासाठी, इच्छूकांनी त्यांचा अर्ज लवकरात लवकर भरावा. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन लॉग इन करावे लागेल. (NEET UG 2025 form filling last date is 7 march candidates can apply)

राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG 2025) परीक्षेची अधिसूचना NTA ने 7 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिद्ध केली होती. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. आता अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2025 रोजी संपणार आहे. या परीक्षेद्वारे देशभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस आणि इतर कार्यक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो. NEET UG प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरणाऱ्या सामान्य श्रेणीतील अर्जदारांना 1700 रुपये शुल्क भरावे लागेल. तर, जनरल-ईडब्ल्यूएस आणि ओबीसी-एनसीएलसाठी 1600 रुपये द्यावे लागतील. याशिवाय, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि तृतीय लिंग उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागेल.

हेही वाचा… Stock Market Crash : असेच सुरू राहिले तर, शेअर मार्केटमधील घसरणीवर काय म्हणाले नितीन कामत?

नीट युजी परीक्षा 4 मे 2025 ला घेतली जाईल. ही परीक्षा पेन आणि पेपर पद्धतीने म्हणजेच लिखित घेतली जाईल. ही परीक्षा दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत 3 तासांसाठी घेतली जाईल. या परीक्षेचे हॉल तिकीट 26 एप्रिल 2025 पर्यंत जारी केले जातील. 2025 च्या नीट युजी परीक्षेचे प्रवेशपत्र 1 मे पर्यंत प्रसिद्ध केले जातील. एनटीएने नीट यूजी परीक्षेबाबत हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केले आहेत. त्यानुसार, उमेदवार 011-40759000/011-69227700 वर संपर्क साधू शकतात किंवा [email protected] वर ईमेल करू शकतात. याशिवाय, उमेदवार अधिक माहितीसाठी पोर्टलला भेट देऊ शकतात.