(ZP Principal) हैदराबाद : अभ्यास न करणाऱ्या तसेच बेशिंस्त आणि दंगेखोर विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून बेदम मारहाण केल्याचे व्हिडीओ वरचेवर व्हायरल होत असतात. पण आंध्र प्रदेशमधील एका जिल्हा परिषदेच्या शाळेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांची खराब शैक्षणिक कामगिरी आणि बेशिस्तपणाने नाराज झालेल्या एका मुख्याध्यापकांनी स्वत:लाच शिक्षा केली आणि तीही मैदानात सर्व विद्यार्थ्यांसमोर. मुख्याध्यापकाच्या या अनोख्या शिक्षेने सर्वांना चकीत केले आहे. (Punished himself due to students’ academic performance)
साधारणपणे सरकारी शाळांऐवजी खासगी शाळांमध्ये मुलांना प्रवेश देण्यावर पालकांचा भर असतो. दोन्ही शाळांच्या शैक्षणिक स्तरांमध्ये खूप फरक असतो, अशी बहुतांश सर्वच पालकांची धारणा आहे. मात्र, सरकारी शाळांमधील अनेक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी झटत असतात, हेही वास्तव आहे.
In #AndhraPradesh Headmaster Chinta Ramana, ZP High School, Bobbili Mandal, Vizianagaram District gets all praise for the way he addresses students’ lack of academic progress & discipline. He punishes himself for asking what is the otherwise alternative to making a student study pic.twitter.com/edxgGYRzXg
— Deepika Pasham (@pasham_deepika) March 13, 2025
विजयनगरम येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची खराब शैक्षणिक कामगिरी तसेच शिस्तभंगामुळे मुख्याध्यापक चिंता रमण हताश झाले. त्यांनी स्वतःला शारीरिक शिक्षा देत आपली नाराजी उघड केली. आपले अपयश स्वीकारत मुख्याध्यापक चिंता रमण यांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर उठबशा काढल्या. विद्यार्थ्यांसमोर स्टेजवर उभे राहून त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक सुधारणा करण्यात आणि त्यांना शिस्त लावण्यात आपण अपयशी ठरलो आहेत, असे सांगत त्यांनी, विद्यार्थ्यांना योग्यरित्या शिकवू न शकल्याबद्दल स्वतःला दोष दिला. त्यानंतर याची जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपले कान पकडत स्टेजवरच 50पेक्षा जास्त उठाबशा काढल्या.
हेही वाचा – Union Govt about Delhi stampede : 15 फेब्रुवारीला किती तिकिटे विकली, केंद्र सरकारने दिली माहिती
विद्यार्थ्यांसाठी हे अनपेक्षित होते. त्याच वेळी, काही विद्यार्थी त्याला उठाबशा न काढण्याची विनंतीही करत होते. राज्यमंत्री नारा लोकेश यांनी या घटनेबद्दल मुख्याध्यापक चिंता रमण कौतुक केले. मुलांना शिक्षा न करता त्यांना समज आणि आत्म-शिस्त शिकवण्याचा हा एक चांगला मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Nana Patole : ‘एकनाथ शिंदे अन् अजितदादांनी आमच्याकडे यावे, दोघांना मुख्यमंत्री बनवू’; नाना पटोलेंची खुली ऑफर