Chhattisgarh Election 2023: छत्तीसगड विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी सुरगुजा येथे पोहोचले होते. जिथे त्यांनी अंबिकापूरच्या कटकलो येथे जाहीर सभेला संबोधित केले. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात जात जनगणनेचा उल्लेख केला. मात्र यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींसाठी अयोग्य भाषा वापरली.ते मोदींना मागास म्हणाले. यासोबतच राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरही हल्लाबोल केला. (Chhattisgarh Election 2023 Prime Minister Narendra Modi takes all decisions for the benefit of Gautam Adani Rahul Gandhi s attack )
काय म्हणाले राहुल गांधी?
काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी म्हणाले होते की नोटबंदी केली की काळा पैसा बाहेर येईल पण काळा पैसा नष्ट झाला का? उलट वाढला. त्यांनी म्हटलं होत की, GST आणतो. देशाची प्रगती होईल. जीएसटीचा कोणाला फायदा झाला का? उलट महागाई वाढली. काँग्रेसच्या कार्यकाळात 400 रुपयांचा सिलिंडर मिळत होता आज किंमत किती झाली? 1200 रुपये. नरेंद्र मोदी म्हणाले होते 15 लाख रुपये प्रत्येकांच्या अकाऊंटमध्ये जमा होतील. शेतकऱ्यांसाठी जे कायदे आणले त्यामुळे शेतकरी आंदोलनाला बसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळे कायदे हे केवळ गौतम अदानींसाठी आणत आहेत, असं म्हणत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
भाजप पैसा उद्योगपतींना देतं
गौतम अदानींना खाणी दिल्या जातात. जंगलं दिली जातात. जमीन सगळं तुमच्याकडून हिरावून अदानींना दिलं जात आहे. भाजपाचे लोक आले की ते फक्त एकच गोष्ट करतात खोटी आश्वासनं देणं. आम्ही खोटी आश्वासनं देणार नाही. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सिलिंडरवर 500 रुपयांची सबसिडी देऊ. बेरोजगार, मजूर, गरीब लोकांच्या खिशात पैसे कसे जातील आम्ही पाहू. मोदींना तसं वाटत नाही, त्यांना वाटतं सगळा पैसा अदानींच्या खिशात जावा, शेतकरी, गरीब, छोटे दुकानदार, मजूर यांच्या खिशात पैसे गेले पाहिजेत.
राहुल गांधी म्हणाले की, छत्तीसगढ हे राज्य गरीब नाही. मात्र, भाजपचं सरकार आलं की इथला पैसा उद्योगपतींना दिला जातं आहे. त्यामुळे यावेळी गरिबांचं सरकार आलं पाहिजे. जे काम पक्त काँग्रेस करतं. आम्हाला गरीबांना मदत करणं ठाऊक आहे आणि भाजपाला उद्योजकांना मदत करणं ठाऊक आहे, असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
(हेही वाचा: सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत धक्कादायक विधान, म्हणाले… )