घरElection 2023तेलंगणात काँग्रेसचा झेंडा फडकणार, त्यांनतर केंद्रातील सरकारला खाली खेचू - राहुल गांधी

तेलंगणात काँग्रेसचा झेंडा फडकणार, त्यांनतर केंद्रातील सरकारला खाली खेचू – राहुल गांधी

Subscribe

हैदराबाद :  तेलंगणाच्या सत्तेतबदल झाल्यानंतर केंद्रातील मोदींचे सरकार पाडू, असा विश्वास काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे. राहुल गांधींनी तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील पिनापाका येथील आयोजित सभेत संबोधित करताना मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्यावर हल्लाबोल केला. येथे सत्ताबदल झाल्यानंतर आम्ही केंद्रातील मोदींचे सरकार पाडू

मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, “तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीने केलेल्या भ्रष्टाचार दिसून येत आहे. तेलंगणात लोकांचे सरकार यावे, हा काँग्रेसचा प्रमुख हेतू आहे. तेलंगणाच्या सत्तेतबदल झाल्यानंतरकेंद्रातील मोदींची सरकार पाडू, खात्री के. चंद्रखेरराव यांना देखील आहे. तेलंगणात काँग्रेसचा मोठा विजय होणार आहे, हे त्यांना माहिती आहे, असा विश्वास राहुल गांधींनी सभेला संबोधित करताना म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘सरकार भगवीकरण करतंय’; क्रिकेट संघाच्या जर्सीवरून ममता बॅनर्जी संतापल्या

“ज्या ज्या खात्यात पैशांची कमाई होते ना ती सर्व खाती मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या हातात आहेत. मग मद्यापासून ते महसुलापर्यंत सर्व काही मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाकडे आहे. या राज्यातील जनते वेगळ्या राज्याचे स्वप्न पाहिले होते. पण चंद्रशेखर राव यांनी एकाच कुटुंबाचे भले करताना दिसतात आणि त्यांनी सर्वसामान्यांचे एक लाख कोटी रुपये लुटले आहे”, असा आरोपही राहुल गांधींनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Uttarkashi Tunnel: उत्तरकाशी बोगद्यात अडकले 40 मजूर; ड्रिलिंग अयशस्वी, ‘या’ तीन पर्यायांचा वापर

‘या’ तीन पक्षाचे सरकार

राहुल गांधी पुढे म्हणाले, “तेलंगणात बीआरएस, भाजप आणि असदुद्दीन ओवेसी या तिन्ही पक्ष एकत्र काम करत असून 2019च्या लोकसभा निवडणुकीत बीआरएसने भाजपला पाठिंबा दिला होता आणि ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार होता. त्या त्या ठिकाणी बीआरएसने उमेदवार दिला होता.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -