घरElection 2023शिवराज सिंह-कमलनाथांसह 2533 उमेदवारांचे भाग्य EVM मध्ये बंद; MP मध्ये सरासरी 71% मतदान

शिवराज सिंह-कमलनाथांसह 2533 उमेदवारांचे भाग्य EVM मध्ये बंद; MP मध्ये सरासरी 71% मतदान

Subscribe

मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 71.11 टक्के मतदान झाले.

भोपाळ : मध्य प्रदेशातील मतदारांनी आज शुक्रवारी (17 नोव्हेंबर) विधानसभेच्या 230 जागांसाठी मतदान केले. कडाक्याच्या थंडीत सकाळपासूनच मतदार आपापल्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचताना दिसले. सकाळी सात वाजतापासून सुरू झालेल्या मतदानापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 71 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली असून, या दरम्यान काही ठिकाणी हिंसेच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. (Fate of 2533 candidates locked in EVM including Shivraj Singh-Kamal Nath Average voter turnout in MP is 71%)

मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 71.11 टक्के मतदान झाले. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक लोकसभा निवडणुकीसाठी लिटमस टेस्टपेक्षा कमी नाही.
मतदारांनी शेवटचे 15 महिने कमलनाथ सरकार आणि शिवराज सरकारची साडेतीन वर्षे पाहिली. त्या आधारावर मध्य प्रदेशमधील जनता आता कुणाला पसंती देते हे येणारा काळ ठरवणार आहे.

- Advertisement -

यावेळी कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचे भवितव्य पणाला लागले असतानाच, भाजपच्या केंद्रीय मंत्री आणि चार खासदारांच्या राजकीय भवितव्यासाठीही ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा : डीपफेक हा भारताला भेडसावत असलेला सर्वात मोठा धोका; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता

- Advertisement -

मतदानावेळी हिंसक वळण

इंदूर परिसरात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांनी विधानसभा उमेदवार मालिनी गौर यांचा मुलगा आणि शहर भाजप उपाध्यक्ष एकलव्य सिंग गौर यांच्यावर गुन्हा दाखल केला. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस आणि वाल्मिकी समाजाने घेराव घातला होता. दबाव आणल्यानंतर पोलिसांनी मारहाणीचा आणि एससी,एसटी अंतर्गत गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल; राज्यपालांकडे पत्र लिहून केली कारवाईची मागणी

शेवटच्या तासात वातावरण तणावपूर्ण

विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या तासात माजी विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे समर्थक आमनेसामने आल्याने अतिशय गोंगाट आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनाही नेमके काय घडतेय याचा थांगपत्ता लागला नाही. या घटनेत एएसआय जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, उत्तर मध्य विधानसभा मतदारसंघातील हनुमंतल पोलीस स्टेशन परिसरात मतदान केंद्रावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर काही काळ मतदान होऊ शकले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -