HomeElection 2023Mizoram Election Results 2023: मिझोरामच्या 40 जागांचे कल हाती; ZPM ला बहुमत,...

Mizoram Election Results 2023: मिझोरामच्या 40 जागांचे कल हाती; ZPM ला बहुमत, उपमुख्यमंत्री तॉनलुईया पराभूत

Subscribe

मिझोरम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून, समोर येत असलेल्या ट्रेंडनुसार झोरम पीपल्स मूव्हमेंट राज्यात सरकार स्थापन करणार आहे. झेडपीएम सध्या 27 जागांवर आघाडीवर आहे.

ऐजौल: मिझोरम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून, समोर येत असलेल्या ट्रेंडनुसार झोरम पीपल्स मूव्हमेंट राज्यात सरकार स्थापन करणार आहे. झेडपीएम सध्या 27 जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट 10 जागांपर्यंत मर्यादित आहे. भाजप 2 जागांवर आघाडी घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट असून केवळ 1 जागा काँग्रेसला मिळताना दिसत आहे. दुसरीकडे मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तॉनलुईया यांचा पराभव झाला आहे. (Mizoram Election Results 2023 Trends for 40 Mizoram seats up for grabs ZPM wins majority Deputy Chief Minister Tonluia defeated)

राज्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा असून बहुमताचा आकडा 21 आहे. येथील मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार होती, परंतु निवडणूक आयोगाने मिझोरममधील निकालाची तारीख बदलली (Mizoram Election Result 2023). सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणुकीच्या तारखेत बदल करण्याची मागणीही केली होती. पत्रात असे म्हटले आहे की मिझोराममधील जनतेचा रविवार हा पूजा करण्याचा दिवस असतो.

मिझोराममध्ये सीएम झोरमथंगा यांची MNF सत्तेवर आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोल डेटाने मिझोरममध्ये MNF साठी मोठ्या नुकसानाचा अंदाज वर्तवला होता. तो सत्य होताना दिसत आहे. मिझोराममध्ये सत्ताविरोधी लाट होती. ‘मिझोराममध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार?’ या प्रश्नाला उत्तर देताना 40 टक्के लोकांची पसंती लालदुहोमाला होती. हे ट्रेंडमध्येही दिसून येत आहे.

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये केवळ 17 टक्के लोकांनी विद्यमान मुख्यमंत्री पुढील मुख्यमंत्री म्हणून पसंत केले आहेत. दुसरीकडे, एमएनएफच्या सत्ताविरोधी लाटेचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसला फारसे काही करता आले नाही. भाजपने एकूण 40 जागांपैकी केवळ 23 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि भाजपचीही स्थिती फारशी चांगली दिसत नाही.

(हेही वाचा: Election 2023: भाजप-कॉंग्रेस सोडा, तीन महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या ‘BAP’ ने मारली बाजी )