घरElection 2023राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल, म्हणाले - "कोरोनात मृत्यूचे तांडव सुरू...

राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल, म्हणाले – “कोरोनात मृत्यूचे तांडव सुरू असताना…”

Subscribe

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी आज (ता. 16 नोव्हेंबर) राजस्थानमधील चुरू येथील एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्र डागले.

राजस्थान : देशात सध्या विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्याच्या निवडणुका व्हायच्या बाकी आहेत. यांतील मध्य प्रदेशमध्ये उद्या (ता. 17 नोव्हेंबर) मतदान पार पडणार आहे. तर छत्तीसगडमध्येही दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया होणार आहे. तर राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला निवडणुका पार पडणार आहेत. या राज्यात प्रचारासाठी सर्वच पक्षांचे नेते जात असून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी आज (ता. 16 नोव्हेंबर) राजस्थानमधील चुरू येथील एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्र डागले. कोरोना काळात देशभरात मृत्यूचे तांडव सुरू असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे थाली वाजवण्यास सांगत होते, मोबाईल टॉर्च लावण्यास सांगत होते, असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे. (Rahul Gandhi criticizes PM Narendra Modi while campaigning in Rajasthan)

हेही वाचा – राजस्थान-महाराष्ट्रातील चोरांनी लंपास केलेल्या प्राचीन मूर्ती हस्तगत, 1970चे कारनामे उघड

- Advertisement -

यावेळी सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आमचे सरकार गरिबांसाठी काम करते. सामान्य लोकांचे आम्ही सरंक्षण करतो. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी जीएसटी लागू केला आणि आता देशातील शेतकऱ्यांना कर भरावा लागत आहे. त्यांनी नोटाबंदी केली आणि छोटे व्यापारी, उद्योजकांना उद्धवस्त केले. आज लोक पंतप्रधान मोदींच्या आश्वासनांवर हसतात. 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. लोकांना ते मिळाले का? मोदींचा हमीभाव म्हणजे अदानीचा हमीभाव आणि काँग्रेसचे सरकार म्हणजे शेतकरी आणि मजुरांचे सरकार आहे.

तसेच, राजस्थान सरकारने लोकांसाठी खूप काम केले असून भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास आम्ही ज्या योजना राबवल्या, त्या रद्द करतील आणि अब्जाधीशांसाठी काम करेल. त्यामुळे तुम्हाला अदानींचे सरकार हवे आहे की शेतकरी, मजूर आणि तरुणांचे सरकार हवे? असा प्रश्न राहुल गांधी यांच्याकडून या सभेत लोकांसमोर उपस्थित करण्यात आला. जिकडे पाहावे तिकडे अदानी काही ना काही धंदा करत आहे. विमानतळ, बंदरे, सिमेंट प्लांट, रस्ते सर्व त्याच्या मालकीचे आहेत. पंतप्रधान मोदी श्रीमंतांसाठी काम करतात. ते अदानीला मदत करतात, अदानी पैसे कमवतात आणि तो पैसा परदेशात वापरला जातो, असा थेट आरोपही राहुल गांधी यांच्याकडून यावेळी भरसभेत करण्यात आला.

- Advertisement -

यावेळी राहुल गांधींनी कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून सुद्धा पंतप्रधानांवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदा आणला. त्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असे सांगण्यात आले. पण त्याविरोधात देशातील सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन केले. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून अदानी-अंबानी यांच्या हिताचा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्यानंतर काँग्रेसनेदेखील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला साथ दिली आणि हा काळा कायदा हाणून पाडला, असे यावेळी राहुल गांधी यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -