हैदराबाद : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांच्या चार राज्यांचा निकाल काल जाहीर करण्यात आला आहे. यांतील 3 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली असून एका राज्यांत काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यामुळे आता उत्तरेत भाजपाचे प्राबल्य तर दक्षिणेच्या राज्यांमध्ये काँग्रेसने सत्ता काबिज केली आहे. तेलंगणा राज्यात 119 विधानसभेच्या जागांसाठीचे मतदान पार पडले होते. यांतील 64 जागांवर काँग्रेसने विजय मिळवत एकहाती विजय मिळवला आहे. ज्यामुळे आता काँग्रेसने या राज्यांत सत्ता स्थापनेवर दावा केला आहे. काँग्रेसच्या या विजयामागे अनेक चेहरे आहेत. काँग्रेसचा तेलंगणात विजय झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा होत आहे ती रेवंथ रेड्डी, तेलंगणाचे प्रभारी, महाराष्ट्रातील नेते असलेले माणिकराव ठाकरे आणि कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची. पण तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळावे, यासाठी विशेष रणनिती आखण्यात आली होती आणि ती आखली होती 40 वर्षीय सुनील कनुगोलू या व्यक्तीने. (Telangana Congress: BRS’s 10-year rule in Congress has collapsed due to ‘this’ man’s strategy)
हेही वाचा – Telangana Result : तेलंगणात काँग्रेसची एकहाती सत्ता, राज्यपालांची घेतली भेट
सुनील कनुगोलू हे राजकीय रणनितीकार असून त्यांच्यामुळे आज काँग्रेसला किमान एका राज्यात तरी आपली सत्ता स्थापन करता येणार आहे. सुनील कनुगोलू यांनी दोन वर्षांपूर्वी तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. त्यावेळी केसीआर यांनी स्वतःच कनुगोलू यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्यामुळे कनुगोलू यांनी केसीआर यांची भेट घेतली होती. या दरम्यान त्यांच्या अनेक भेटीही झाल्या होत्या. आगामी निवडणुकीसाठी सुनील यांनी बीआरएस पक्षासाठी निवडणुकीची रणनिती आखावी, असे मत देखील केसीआर यांनी व्यक्त केले होते. परंतु, सुनील कनुगोलू यांनी केसीआर यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला.
सुनील हे नुकतेच तामिळनाडुच्या निवडणुकीतून मोकळे झाले होते्. त्यामुळे नवी जबाबदारी घ्यायला सज्ज होते. अनेक दिवस बैठक झाल्यानतंर केसीआर राव यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अचानक सर्वांना धक्का देत काँग्रेसच्या निवडणूक रणनिती समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. ज्या केसीआर यांच्यासोबत निवडणुकीबद्दल चर्चा केली त्यांच्याच विरोधात आता रणनिती ते आखणार होते. विधानसभा निवडणूक निकालानंतर केसीआर यांना त्यांच्या या निर्णयाचा पश्चाताप होऊ शकतो.
तामिळनाडूच्या निवडणुकीतून मोकळे झाल्यानंतर सुनील कनुगोलू हे नवीन जबाबदारी घेण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी त्यांची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत बैठक झाली. ज्यानंतर त्यांची अचानकपणे काँग्रेसच्या निवडणूक रणनिती समितीच्या अध्यक्षपदी घोषणा करण्यात आली. ज्यामुळे अनेकदा सुनील यांच्यासोबत चर्चा केलेल्या केसीआर यांना मोठा धक्का बसला. कारण ज्या केसीआर यांच्यासोबत निवडणुकीबद्दल चर्चा केली त्यांच्याच विरोधात सुनील कनुगोलू यांनी रणनिती आखली. ज्यामुळे केसीआर यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. कनुगोलू यांनी काँग्रेससाठी काम करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी याआधी देखील मे महिन्यात झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. ज्यामुळे काँग्रेसला कर्नाटकात मोठा विजय मिळवता आला होता.
तेलंगणातील काँग्रेसमध्ये अनेक अंतर्गत वाद होते. ज्यामुळे तेलंगणात काँग्रेसला जिंकण्याची खूप कमी शक्यता होती. परंतु, सुनील कनुगोलू यांनी काँग्रेस बीआरएसला पराभूत करू शकते, असे सांगितले. त्यानंतर सुनील यांनी काम सुरू केले आणि राज्यातील पक्षात सुधारणा केल्या. कर्नाटकप्रमाणेच केसीआर यांना बॅकफूटवर टाकले. केसीआर यांनी सुनील यांच्यामागे पोलीसही लावले. हैदराबादमध्ये त्यांच्या कार्यालयावर छापा टाकला गेला. सुनील यांची चौकशीही झाली. इतके होऊनही सुनील यांनी आपले काम सुरूच ठेवले, ज्याचे चित्र सध्या तेलंगणात दिसून येत आहे. सुनील हे थेट राहुल गांधी यांना रणनिती सांगतात. राज्यात सत्ता आणण्यासाठी काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे, याचा सल्लाही त्यांच्याकडून देण्यात येतो.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख रणनितीकारांपैकी एक सुनील होते. 2017 मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मूळचे कर्नाटकच्या बेल्लारीचे असलेले सुनील यांनी अमेरिकेतून उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर एक ग्लोबल कन्सल्टिंग फर्म मॅकिन्ससोबत काम केले आहे. एमके स्टॅलिन यांच्यासोबतही ते होते आणि 2019 च्या लोकसभेवेळी त्यांनी जबरदस्त काम केले होते. त्या निवडणुकीत डीएमकेच्या नेतृत्वाखाली आघाडीला 39 पैकी 38 जागा जिंकून दिल्या होत्या. मात्र प्रशांत किशोर डीएमकेमध्ये पक्षाच्या रणनितीसाठी सहभागी होताच सुनील बाजूला झाले. सुनील कानुगोलू यांनी फक्त दहा वर्षातच ही झेप घेतली आहे. ज्यामुळे आता त्यांचे निवडणूक रणनितीकारांमध्ये प्रामुख्याने नाव घेतले जाते.