घरElection 2023Telangana Result : तेलंगणात काँग्रेसची एकहाती सत्ता, राज्यपालांची घेतली भेट

Telangana Result : तेलंगणात काँग्रेसची एकहाती सत्ता, राज्यपालांची घेतली भेट

Subscribe

तेलंगणातील काँग्रेसच्या नेत्यांनी निकालाची आकडेवारी समोर येताच तेलंगणाच्या राज्यपालांची भेट घेतली. तर काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची उद्या मंगळवारी (ता. 05 डिसेंबर) सकाळी बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हैदराबाद : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांच्या चार राज्यांचा निकाल काल जाहीर करण्यात आला आहे. यांतील 3 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली असून एका राज्यांत काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यामुळे आता उत्तरेत भाजपाचे प्राबल्य तर दक्षिणेच्या राज्यांमध्ये काँग्रेसने सत्ता काबिज केली आहे. तेलंगणा राज्यात 119 विधानसभेच्या जागांसाठीचे मतदान पार पडले होते. यांतील 64 जागांवर काँग्रेसने विजय मिळवत एकहाती विजय मिळवला आहे. ज्यामुळे आता काँग्रेसने या राज्यांत सत्ता स्थापनेवर दावा केला आहे. यासाठी काल काँग्रेसच्या नेत्यांनी निकालाची आकडेवारी समोर येताच तेलंगणाच्या राज्यपालांची भेट घेतली. तर काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची उद्या मंगळवारी (ता. 05 डिसेंबर) सकाळी बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Telangana Result: Congress claims to form government in Telangana after meeting Governor)

हेही वाचा – Telangana DGP : तेलंगणाच्या महासंचालकांना ‘ती’ एक चूक पडली महागात, ECI ने केली निलंबनाची कारवाई

- Advertisement -

तेलंगणाचे राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांची काल काँग्रेसचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, तसेच तेलंगणातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा करत विजयी आमदारांची आकडेवारी सादर केली. यानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलताना म्हणाले की, आज आमचे सरचिटणीस प्रभारी (काँग्रेस) माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व AICC निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यपालांना भेटलो आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तसेच, उद्या आमची नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक होईल. काँग्रेस पक्षाची एक कार्य पद्धती आहे. त्यानुसार आम्ही चर्चा करून याबाबत आपल्याला माहिती देऊ, असे शिवकुमार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काँग्रेसने तेलंगणा राज्यात 119 जागांपैकी 64 जागांवर विजय मिळवला आहे. तर एका कम्युनिस्ट पक्षाच्या विजयी उमेदवाराने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. ज्यामुळे आता काँग्रेसकडे 65 चे संख्याबळ झाले आहे. त्यामुळे या 65 आमदारांचे काँग्रेसच्या सत्ता स्थापनेला समर्थन असल्याचे राज्यपालांच्या या भेटीवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, तेलंगणातील गेल्या 10 वर्षांपासूनची बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती पक्षाची सत्ता संपुष्टात आली आहे. ज्यामुळे आता के. चंद्रशेखरराव (KCR) यांना आपली ही सत्ता गमवावी लागली आहे. काँग्रेसचा पाच राज्यांपैकी केवळ एका राज्यात विजय मिळवला असला तरी त्यांनी भाजपाला दक्षिणेच्या राज्यातून हद्दपार केले आहे. मात्र, आता या राज्यात पराभूत झालेल्या बीआरएस आणि भाजपाकडून आमदारांचा घोडेबाजार केला जाऊ नये, यासाठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -