घरमनोरंजन'फन्ने खाँ'चा टीझर रिलीज

‘फन्ने खाँ’चा टीझर रिलीज

Subscribe

अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत. 'फन्ने खाँ'चं ट्रेलर प्रदर्शित

बॉलीवूडचा झक्कास अभिनेता अनिल कपूर आणि जगत् सुंदरी ऐश्वर्या राय पुन्हा एकदा बऱ्याच वर्षानंतर प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. या दोघांनी अभिनय केलेल्या ‘फन्ने खाँ’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हे टीझर लाँच होऊन काहीच अवधी झाला असून सध्या व्हायरल होत आहे. ‘आपल्या स्वप्नांना केवळ आपले सूर ऐकवू इच्छितो अशा व्यक्तीची ही कथा आहे’ हीच चित्रपटाची थीम लाईन आहे. थोड्याच दिवसापूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्यामध्ये अनिल कपूरच्या हातामध्ये म्युझिक इन्स्ट्रूमेंट दिसत आहे. या ट्रेलरमध्ये ऐश्वर्या रायची मात्र हलकीशी झलक पाहायला मिळाली आहे.

अनिल आणि ऐश्वर्या बऱ्याच वर्षांनंतर

अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय बऱ्याच वर्षांनी एकत्र येत आहेत. या चित्रपटात या दोन्ही कलाकारांसह राजकुमार राव, दिव्या दत्ता, करण सिंह छाब्रा यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. फन्ने खाँ ची भूमिका अनिल कपूर साकारत असून एक स्ट्रगरल गायकाची ही भूमिका आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या राय एका रॉकस्टारच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चाहत्यांना ऐश्वर्याचा हा नवा लुक खूपच भावत आहे. यावेळी ऐश्वर्या राय एका वेगळ्या भूमिकेत चाहत्यांसमोर येणार आहे. ‘फन्ने खाँ’ चित्रपटाचं दिग्दर्शन अतुल मांजरेकर यांनी केलं असून हा चित्रपट ३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत. यापूर्वी अनिल आणि ऐश्वर्यानं १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ताल’ आणि २००० साली आलेला ‘हमारा दिल आपके पास है’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -