Maharashtra Assembly Election 2024
घरमनोरंजनVikrant Massey: ‘12th Fail’फेम अभिनेता झाला बाबा, अभिनेत्याची खास पोस्ट

Vikrant Massey: ‘12th Fail’फेम अभिनेता झाला बाबा, अभिनेत्याची खास पोस्ट

Subscribe

टीव्ही ते मोठा पडदा असा काही वर्षांचा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी. सध्या त्याच्या “12th Fail” या सिनेमामुळं चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटासाठी नुकताच त्याला फिल्मफेअर हा मानाचा पुरस्कारदेखील मिळाला आहे. आता नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत विक्रांतने त्याच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. . विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरने ७ फेब्रुवारी रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आपण बाबा झाल्याची गोड बातमी विक्रांतने सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून शेअर केली आहे.

गेल्या काही महिन्यांत अनेक बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं स्वागत झालं. विक्रांत मेस्सीची पत्नी शीतल ठाकूर हिनं काही महिन्यांपूर्वी गरोदर असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

- Advertisement -

विक्रांतने शेअर केली खास पोस्ट
विक्रातंन या पोस्टमध्ये लिहिलं की, “आम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, आमच्या घरी एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. त्यामुळे आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आम्हा दोघांना मुलगा झाला असून त्या लहान जीवाला शितल व विक्रांत यांच्याकडून खूप प्रेम” असे म्हटले आहे. विक्रांतच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच त्याच्या मित्र-मंडळींनीही कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

 विक्रांतच्या कामाविषयी
विक्रांत मेस्सीने त्याच्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकेपासून केली होती. नंतर तो हळूहळू चित्रपटांतही छोट्या छोट्या भूमिका करू लागला. ‘मिर्जापुर’ या वेबसीरिजमुळे विक्रांतला खरी ओळख मिळाली. यातील विक्रांतच्या कामाचं प्रचंड कौतुकही झालं. ‘12th fail’या चित्रपटासाठी ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही जाहीर झाला होता. “12th fail” चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. विक्रांत आता लवकरच एकता कपूरच्या “द साबरमती रिपोर्ट” चित्रपटात झळकणार आहे.

- Advertisement -

हे वर्ष ठरलं खास
विक्रांतसाठी हे नवीन वर्ष खऱ्या अर्थानं खास ठरलं आहे.”‘12th fail” सिनेमानं विक्रांतला स्टार बनवलंय. आजवरच्या या प्रवासाबद्दल विक्रांत म्हणतो की, आजवर मला जे काही काम मिळालं, यश मिळालं त्यासाठी मी कृतज्ञ आहे. आपण सगळेच स्वप्नपूर्तीसाठी झपाटल्यासारखी मेहनत घेत असतो आणि ते स्वप्न हळूहळू आकार घेऊ लागतं, तेव्हा त्याबद्दल बोलायला शब्द सुचत नाहीत, तसं आता माझं झालं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -