घरमनोरंजन12th Fail : फिल्मफेअर मिळाल्यानंतर विक्रांत मॅसी भेटला खऱ्या 'हीरो'ला; फोटो केला...

12th Fail : फिल्मफेअर मिळाल्यानंतर विक्रांत मॅसी भेटला खऱ्या ‘हीरो’ला; फोटो केला शेअर

Subscribe

मुंबई : विक्रांत मॅसी अभिनीत ’12वी फेल’ या चित्रपटाला समीक्षकांकडूनच नव्हे तर, प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाच्या कथनकापासून विक्रांतच्या अभिनयापर्यंत सर्वच गोष्टींचे कौतुक होत आहे. या चित्रपटातील अभिनयाबद्दल नुकताच विक्रांतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (समीक्षक) फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. आता हा पुरस्कार घेऊन विक्रांत खुद्द याच्या खऱ्या हीरोकडे गेला होता.

हेही वाचा – Fighter : विकेंडच्या भरारीनंतर हृतिकचे ‘फायटर’ जमिनीवर, प्रेक्षकांकडून थंडा प्रतिसाद

- Advertisement -

विक्रांतने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. आयपीएस अधिकारी मनोजकुमार शर्मा यांच्याबरोबरचा हा फोटो आहे. हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावरून प्रेरित आहे. विक्रांतने मनोज कुमार शर्मा यांच्या हातात या पुरस्काराची ट्रॉफी दिली आणि लिहिले, खरा हीरो. यावेळी मनोजकुमार शर्मा यांच्या चेहऱ्यावर विक्रांतच्या विजयाचा आनंद स्पष्टपणे दिसत आहे. मनोजकुमार शर्मा यांनी देखील इन्स्टाग्रामवर विक्रांतसोबतचा फोटो शेअर केला आणि लिहिले, जेव्हा एक मनोज दुसऱ्या मनोजला त्याची फिल्मफेअर ट्रॉफी दाखवण्यासाठी घेऊन येतो, तेव्हा तो आणखी प्रेमात पडतो.

- Advertisement -

विक्रांतला इतर मोठ्या स्टार्ससह सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या (समीक्षक) पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मनोज वाजपेयी, पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, अभिषेक बच्चन, जयदीप अहलावत, विक्की कौशल अशा दिग्गजांची नावे या यादित होती. पण त्या सर्वांना मागे टाकत विक्रांतने या पुरस्कारावर नाव कोरले. विक्रांत व्यतिरिक्त, 12वी फेल चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट एडिटिंगसाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले आहेत.

12वी फेल चित्रपटाची कथा आयपीएस मनोजकुमार शर्मा यांच्यावर आधारित आहे. आयपीएस अधिकारी बनून देशासाठी काम करेन आणि जे काही बेकायदेशीर आहे ते थांबवेन, असे तो एक दिवशी ठरवतो. मात्र, यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आणि 12वी फेल चित्रपट या संघर्षाची कहाणी आहे.

हेही वाचा – Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -