घरताज्या घडामोडीऋषी कपूर यांच्या प्रचंड गाजलेल्या व्यक्तीरेखा कोणत्या? वाचा!

ऋषी कपूर यांच्या प्रचंड गाजलेल्या व्यक्तीरेखा कोणत्या? वाचा!

Subscribe

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं आज सकाळीच कर्करोगामुळे निधन झालं. त्यांना बुधवारी रात्री त्रास होत असल्यामुळे मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण आज वयाच्या ६८व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये ऋषी कपूर यांनी अनेक महत्त्वाच्या आणि गाजलेल्या भूमिका साकारल्या होत्या.

rishi kapoor in shree 420

- Advertisement -

श्री ४२०

ऋषी कपूर पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकले ते बाल कलाकार म्हणून श्री ४२० या त्यांचे वडील राज कपूर यांच्या चित्रपटामधून! त्यांनी प्यार हुआ इकरार हुआ या अजरामर गाण्यामध्ये ही भूमिका साकारली होती.

- Advertisement -

rishi kapoor in Boby

बॉबी

१९७३ साली प्रदर्शित झालेला बॉबी हा ऋषी कपूर यांचा पहिला मुख्य कलाकार म्हणून चित्रपट. यामध्ये त्यांनी राजा ही प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला.

rishi kapoor in laila majnu

लैला मजनू

लव्ह स्टोरीच्या जमान्यात सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या लैला-मजनू चित्रपटात ऋषी कपूर यांनी मजनूची भूमिका साकारली होती.

rishi kapoor in amar akbar anthony

अमर-अकबर-अँथनी

१९७७ साली प्रदर्शित झालेल्या अमर अकबर अँथनी चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांच्यासोबत प्रमुख भूमिका साकारली होती. अकबर इलाहाबादीची व्यक्तीरेखा त्यांनी साकारली होती. हा चित्रपट त्या काळात विशेष गाजला. विनोदी कलाकार म्हणून या चित्रपटाने त्यांनी ओळख अधिक पक्की केली.

rishi kapoor in sargam

सरगम

काशीनाथुनी विश्वनाथ यांनी दिग्दर्शित केलेला १९७९ सालचा सरगम हा सिनेमा त्यांच्या कारकिर्दीतला बॉबीनंतरचा माईलस्टोन ठरला. यातली त्यांची भूमिका प्रेक्षकांनी विशेष डोक्यावर घेतली. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळालं होतं.

rishi kapoor in karz

कर्ज

इक हसीना थी… हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतं. या सिनेमात ऋषी कपूर यांनी दुसऱ्या भागात पुनर्जन्म घएतलेल्या मॉंटीची भूमिका साकारली होती. सुभाष घई यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. याचा नंतर रिमेक देखील बनवण्यात आला होता.

rishi kapoor in premrog

प्रेमरोग

१९८२ साली आलेल्या राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रेमरोग या सिनेमातल्या त्यांच्या प्रमुख देवधर उर्फ देव या भूमिकेला देखील प्रेक्षकांनी विशेष डोक्यावर घेतलं. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळालं होतं.

rishi kapoor in cooli

कूली

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या आणि १९८३ साली प्रदर्शित झालेल्या कूली चित्रपटामध्ये त्यांनी केलेली सहाय्यक अभिनेत्याची भूमिका देखील विशेष गाजली.

rishi kapoor in chandni

चांदनी

१९८९ साली प्रदर्शित झालेल्या चांदनी या सिनेमात ऋषी कपूर यांनी रोहीत गुप्ता ही प्रमुख भूमिका साकारली होती. यश चोप्रा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. यासाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळालं होतं.

rishi kapoor in dont stop dreaming

डोंट स्टॉप ड्रीमिंग

२००७ साली प्रदर्शित झालेला डोण्ट स्टॉप ड्रीमिंग या सिनेमातून ऋषी कपूर यांनी हिंदी भाषेच्या सीमा ओलांडून इंग्रजी भाषिक अभिनयाच्या विश्वात देखील पदार्पण केलं. आदित्य राजकपूरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

rishi kapoor in luck by chance

लक बाय चान्स

झोया अख्तरने दिग्दर्शन केलेल्या २००९च्या या सिनेमामध्ये ऋषी कपूर यांनी रोमी रॉली ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्यासाठी त्यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळालं होतं.

rishi kapoor in do duni chaar

दो दुनी चार

२०१०साली आलेल्या दो दुनी चारमध्ये ऋषी कपूर यांनी एका त्रासलेल्या बापाची अर्थात संतोष दुग्गल ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्यासाठी त्यांना फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्ड फॉर बेस्ट अॅक्टर पुरस्कार मिळाला होता.

rishi kapoor in agnipath

अग्नीपथ

२०१२साली आलेल्या अग्नीपथ या सिनेमामध्ये त्यांनी रौफ लाला ही निगेटिव्ह भूमिका साकारली होती. त्यासाठी त्यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळालं होतं.

rishi kapoor in kapoor and sons

कपूर अॅण्ड सन्स

शकुन बत्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या २०१६ सालच्या कपूर अॅण्ड सन्स या चित्रपटातल्या अमरजीत कपूर या व्यक्तीरेखेसाठी ऋषी कपूर यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -