15 Years of Vivah:अभिनेत्री अमृता रावने केला शाहिद कपूरसोबतच्या नात्याचा खुलासा

शाहिद आणि अमृता रावच्या नात्याच्या चर्चांवर मात्र दोघांनी त्यावेळी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

15 Years of Vivah amrita rao reveals secret of relationship between shahid kapoor
15 Years of Vivah:अभिनेत्री अमृता रावने केला शाहिद कपूरसोबतच्या नात्याचा खुलासा

हिंदी सिनेमातील काही असे सिनेमे आहेत जे आपण कधीही आणि कितीही वेळा पाहू शकतो. असाच एक सिनेमा म्हणजे विवाह. अभिनेत्री अमृता राव आणि अभिनेता शाहिद कपूरने या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. विवाह सिनेमात अगदी साखरपुड्यापासून लग्नापर्यंतची साधी गोष्ट उत्तमरित्या प्रेक्षकांसमोर मांडली होती. अमृता राव आणि शाहिद कपूर यांचा ऑनस्क्रीन विवाह हा १० नोव्हेंबर २००६मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाला आज १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नासाठी मुलगी बघायला जाण्यापासून ते अगदी साखरपूडा, लग्नापर्यंत सगळ्या विधी सिनेमात दाखवल्या होत्या. पूनम आणि प्रेम यांची जोडी यावेळी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. या सिनेमानंतर अमृता राव आणि शाहिर कपूर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या चर्चांवर अमृता रावने खुलासा केला आहे.

विवाह सिनेमातील तुझको ‘जी भर के देखू मुझे हक है’ या अमृता राव आणि शाहिद कपूर यांच्यावर शुट करण्यात आलेल्या रोमँटिक गाण्याने दोघांच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्रीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या गाण्यामुळेच अमृता रावच नाव शाहिदसोबत जोडण्यात आलं होतं. शाहिद आणि अमृता रावच्या नात्याच्या चर्चांवर मात्र दोघांनी त्यावेळी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

अनेक वर्षांनी का होईन अमृता रावने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याविषयी खुलासा केला आहे. अमृता रावने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, सिनेमा केला तेव्हा आम्ही दोघेही मित्र नव्हतो. शुटींगवेळी आमची चांगली मैत्री झाली. शाहिद माझा खूप छान को आर्टिस्ट आहे. दोघांच्या मनात एकमेकांविषयी खूप रिस्पेक्ट आहे. आम्ही दोघांनी जेव्हा सिनेमावेळी एकत्र काम केले तेव्हा आम्ही ऑलरेडी वेगवेगळ्या माणसांसोबत रिलेशनमध्ये होतो. प्रेक्षकांना मात्र आम्हाला खऱ्या आयुष्यात एकत्र पहायचे होते. मात्र तसं काहीच झालं नाही. आमची जोडी फक्त ऑनस्क्रिन एकत्र होती. शाहिदने एकदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला माझ्यासोबत काम करायचे असल्याचे म्हटले होते. पण आम्हाला एकत्र काम करण्यासाठी कोणी कास्ट का नाही केले हे माहिती असे अमृता म्हणाली.

अमृता रावच्या खऱ्या आयुष्यातील नवरा म्हणजेच आर. जे. अनमोलने त्याच्या आईने विवाह सिनेमा थिएटरमध्ये पाहिल्यानंतर ‘माझी सून असेल तर पूनमसारखी’ असे म्हटले होते. माझ्या आईच्या जिभेवर सरस्वती वास्तव्य करते त्यामुळे माझ्या आईची इच्छा पूर्ण झाली असे अनमोलने एका पोस्टमध्ये म्हटले होते.


हेही वाचा – Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: विक्की कौशल कतरिनाच्या लग्नाचे सात फेरे ८०० वर्ष जुन्या किल्ल्यात