20 Years of K3G: ‘कभी खुशी कभी गम’ला २० वर्ष पूर्ण, सिनेमावेळी झालं होत कजोलचं मिसकॅरेज

20 Years of K3G: Kabhi Khushi Kabhi Gum Movie completes 20 years

बॉलिवूडमधील काही सिनेमे आपण केव्हाही, कधीही आणि कितीवेळा पाहू शकतो त्यातील  एक सिनेमा म्हणजे ‘कभी खुशी कभी गम’. या सिनेमाला २० वर्ष पूर्ण झाली आहेत. १४ डिसेंबर २००१मध्ये कभी खुशी कभी गम या सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर १.३६ बिलियमनची कमाई केली होती. अमिताभ बच्चन,जया बच्चन,ह्रतिक रोशन,करिना कपूर, काजोल,शहारुख खान यांच्या सिनेमात मुख्य भूमिका होत्या.

करण जोहरचा हा सिनेमा म्हणजे ड्रामा,इमोशन्स आणि प्रेमाचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. या सिनेमाने करणच्या करिअरला चार चाँद लावले. करण जोहरचा सिनेमा हा नेहमीच बिट बजेट सिनेमा असतो. त्यात मोठे सेट,महागडे कपडे आणि मोठे स्टार्स असतात. कभी खुशी कभी गम या सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या सिनेमाच्या जोडलेल्या काही ऑफस्क्रिन गोष्टी जाणून घेऊया.

‘यू आर माय सोनिया’ हे गाण शाहरुख काजोलसाठी होत

कह दो ना कह दो ना यू आर माय सोनिया हे गाणं ह्रतिक रोशनवर शुट करण्यात आलयं ज्यात ह्रतिकच्या डान्स स्टेप्सवर मुली आजही फिदा आहेत. पण खरंतर हे गाणं शाहरुख आणि काजोलसाठी लिहिलं गेलं होतं. पण सिनेमातून काजोल आणि शाहरुखला या गाण्यातून काढून टाकण्यात आलं.

सिनेमाच्या मेकिंगवर लिहिलं गेलं पुस्तक 

कभी खुशी कभी गम हा पहिला भारतीय सिनेमा ठरलाय ज्या सिनेमाच्या मेकिंग सीन्सवर एक पुस्तक लिहिण्यात आलं. प्रेक्षकांनी दिलेल्या भरगोस प्रतिसाद आणि प्रेमामुळे हे शक्य झालं असे करण जोहर सांगतो.

‘बोल चूडिया’ गाण्यावेळी करण जोहर झाला होता बेशुद्ध


बोल चूडिया हे गाणं आजही सर्वांच्या आवडीचं आहे. बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, करिना,काजोल,शाहरुख,ह्रतिक सगळेच या गाण्यात दणकून नाचलेत. गाण फार सुंदररित्या शुट करण्यात आलंय. या गाण्याच्या शुटींग दरम्यान करण जोहर चक्क चक्कर येऊन पडला होता.  करण फार तणावात गाण्याचं शुटींग करत होता त्याला पाणी प्यायला देखील वेळ नव्हता डिहाड्रेशनमुळे   करण चक्कर येऊन  पडला होता. त्यानंतर पूर्ण दिवस तो झोपून होता. पुढच गाणं त्याने वॉकी टॉकीवर इंस्ट्रक्शन देऊन शुट केलं होतं.

आर्यन खानने केली होती छोट्या शाहरुखची भूमिका


सिनेमात शाहरुख खानने राहूल हे पात्र साकारलं होतं. सिनेमात शाहरुखचा मुलगा आर्यन खानने देखील छोटा रोल केला होता. छोट्या राहूलची म्हणजेच शाहरुखच्या बालपणीचा रोल आर्यनने केला होता.

काजोलच्या जागी दिसणार होती ऐश्वर्या रॉय


सिनेमातील काजोल आणि शाहरुखची जोडी नेहमीप्रमाणे सुपरहिट ठरली  होती. शाहरुखने राहूल तर काजोलने अंजलीची भूमिका केली होती. मात्र काजोलच्या जागी अंजली या भूमिकेसाठी करणने ऐश्वर्या रॉयला विचारले होते. करणने एका मुलाखती दरम्यान हा खुलासा केला होता.

अमिताभ आणि जया बच्चननी २० वर्षांनी एकत्र काम केलं होतं


अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी म्हणजेच अभिनेत्री जया बच्चन यांनी १९८१मध्ये सिलसिला या सिनेमात एकत्र काम केलं होतं त्यानंतर तब्बल १० वर्षांनी कभी खुशी कभी गमच्या निमित्ताने दोघांनी एकत्र काम केलं होतं.

सिनेमाच्या शुटींगदरम्यान झालं होत काजोलचं मिसकॅरेज

अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांच  लग्न झालं होतं आणि त्यानंतर लगेचच काजोल कभी खुशी कभी गमच्या शुटींगसाठी आली होती. कजोलने एका मुलाखतीत  सांगितलं होतं की, सिनेमाच्या सेटवर प्रचंड तणावाचं वातावरण असायचं. शुटींगच्या वेळी मी प्रेग्नंट होती आणि त्याच दरम्यान माझ मिसकॅरेज झालं होतं. मी त्यावेळी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते.


हेही वाचा – हुश्श! करण जोहरसह अभिनेत्री नीलम कोठारी आणि भावना पांडेचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह