सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसवर 215 कोटींप्रकरणी आरोपपत्र दाखल

खंडणीखोर सुकेश चंद्रशेखरवर 215 कोटी रूपयांची जबरदस्ती वसुली केल्याप्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची तपासणी केल्यावर समजलं की, सुकेशने जॅकलीनला माहागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली असून तिच्यावर 215 कोटींच्या खंडणीप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सक्तवसुली संचालनालयच्या मते, जॅकलीन फर्नांडिसला आधीपासूनच माहीत होतं की, सुकेश एक खंडणी वसुली करणारा आरोपी आहे. तसेच तिला हे देखील माहित होतं की, सुकेश लोकांकडून जबरदस्ती खंडणी वसुली करतो. यामुळेच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आता जॅकलीनवर आरोपपत्र दाखल केलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
खंडणीखोर सुकेश चंद्रशेखरवर 215 कोटी रूपयांची जबरदस्ती वसुली केल्याप्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची तपासणी केल्यावर समजलं की, सुकेशने जॅकलीनला माहागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या. ज्यानंतर सक्तवसुली संचालनालयने (ईडी) कारवाई करत 7 कोटींची संपत्ती देखील जप्त केली. तपासणी दरम्यान या संपूर्ण प्रकरणांचा खुलासा झाला. एका सहकारीने सुकेशची ओळख जॅकलीन सोबत करून दिली होती. तसेच सुकेशच्या सहकारीच्या मदतीने जॅकलीनला हे महागड्या भेट वस्तू पाठवायचा. इतकंच नव्हे तर या दोघांचे काही फोटो देखील समोर आले होते. ज्यातून हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं समोर आलं होतं.

कोण आहे सुकेश चंद्रशेखर?
सुकेश चंद्रशेखर बंगळुरूमधील एक उद्योगपती आहे. आत्तापर्यंत त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. 23 ऑगस्ट 2021 रोजी तिहार जेलमधून आतापर्यंतची सर्वात मोठी खंडणी वसूल करणारा आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि अभिनेत्री लीना पॉलच्या चेन्नईत असलेल्या बंगल्यावर ईडीने छापा टाकला होता. शिवाय ईडीने इस्ट कोस्टरोडवरील असलेल्या सुकेशच्या बंगल्यावर छापा टाकला होता, त्या बंगल्याची किंमत कोट्यावधी होती. छापेमारी दरम्यान ईडीला मोठ्या प्रमाणात कॅश जप्त केली होती आणि 15 लक्झरी गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या.


हेही वाचा :बॉलिवूड कलाकारांनी चित्रपटाची माफक फी घ्यावी; भाजपा नेत्याचा सल्ला