कासिनाधुनी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर महिन्याभरातच पत्नी जयलक्ष्मी यांचे निधन

तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक कासिनाधुनी विश्वनाथ यांचे 2 फेब्रुवारी रोजी म्हणजेच नुकत्याच 24 दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी हैदराबादमधील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता. दरम्यान, अशातच आज 28 फेब्रुवारी रोजी त्यांच्या पत्नी जयलक्ष्मी यांचे देखील निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्थिर होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टर त्यांना बरं करण्याचे अनेक प्रयत्न करत होते. मात्र, वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

सध्या त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात अभिनेता पवन कल्याण आणि चिरंजीवी दिसत आहे. काही दिवसांपूर्वी जयलक्ष्मी रुग्णालयात असताना हे दोन्ही कलाकार त्यांना भेटायला गेले होते.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

जयलक्ष्मी यांच्या निधनाने त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. अवघ्या 24 दिवसांपूर्वीच जयलक्ष्मींचे पती कासिनाधुनी विश्वनाथ देखील निधन झाले होत. त्या दुःखातून सावरण्याच्या आधीच कुटुंबाला आणखी एक मोठ्ठा धक्का बसला आहे. जयलक्ष्मी यांच्या निधनावर अनेक कलाकार शोक व्यक्त करत आहेत. त्यांच्या पश्चात कुटुंबात 3 मुले रवींद्रनाथ विश्वनाथ, नागेंद्रनाथ विश्वनाथ आणि एक मुलगी पद्मावती विश्वनाथ आणि 6 नातवंडे आहेत.

 


हेही वाचा :

आलियाने सेल्फी काढण्यासाठी मागितला सॅमसंगचा फोन; व्हिडीओ व्हायर