Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 29 वर्षीय प्रसिद्ध कोरियन गायिका हेसूची आत्महत्या

29 वर्षीय प्रसिद्ध कोरियन गायिका हेसूची आत्महत्या

Subscribe

नुकत्याच काही दिवसांपूर्वी कोरियन के पॉप स्टार गायक मूनबिन याने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले होते. या बातमी कोरियन पॉप बँडच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अशातच प्रसिद्ध कोरियन गायिका हेसू हिने देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका हॉटेलमध्ये या गायिकेच्या संशयास्पद मृतदेह सापडला आहे.

29 वर्षीय कोरियन गायिका हेसूचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र ती त्या कार्यक्रमासाठी आली नाही. त्यानंतर पोलिसांनी तिचा तपास सुरु केला. शनिवारी 13 मे रोजी हेसूचा मृतदेह एका हॉटेलच्या रुममध्ये सापडला. या वेळी तिच्या मृतदेहासोबत एक पत्र देखील सापडलं. जे सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हेसूच्या निधनाने चाहत्यांना धक्का

- Advertisement -

- Advertisement -

हेसूच्या मृत्यूच्या बातमीने तिचे चाहते असून सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. अनेक चाहत्यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

2019 पासून केली होती करिअरली सुरुवात

हेसूचा जन्म 1993 मध्ये झाला असून तिने 2019 मध्ये ‘My life Me’ या अल्बमपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हेसू ही दक्षिण कोरियातील लोकप्रिय गायिका असून तिच्या जाण्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.


हेही वाचा :

आमच्या कल्पनेपेक्षा मोठे कुटुंब मिळाले… परिणीतीची नवी पोस्ट चर्चेत

- Advertisment -