Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी एका दिवसात ३ जवळच्या व्यक्तींचा मृत्यू, 'ही' अभिनेत्री करतेय सर्वांना मदत...

एका दिवसात ३ जवळच्या व्यक्तींचा मृत्यू, ‘ही’ अभिनेत्री करतेय सर्वांना मदत करण्याचे आवाहन

मदतीसाठी पोहचलेल्या सर्वांचे भूमीने मानले आभार

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाचा हाहा:कार सुरु आहे. रोज लाखोंच्या घरात लोकांचा मृत्यू होत आहे. या महामारीमुळे सर्व सामान्यांप्रमाणे अनेक बॉलिवूड कलाकारही फरफटले गेले आहेत. आपल्या जवळच्या माणसांच्या जाण्याने देशात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नुकतीच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर अशाच परिस्थितीतून जात आहे. नुकतेच भूमीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींचे कोरोमुळे निधन झाल्याचे भूमीने तिच्या सोशल मीडियावरुन सांगितले आहे. २४ तासात मी माझ्या जवळच्या ३ व्यक्तींना गमावले आहे. एकाची तब्येत खूप खराब असल्याचे तिने सांगितले. आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावल्या नंतर भूमी सध्या सोशल मीडियावर सर्वांनी एकमेकांना मदत करण्याचे आवाहन करत आहे.

- Advertisement -

नुकतीच भूमीला तिच्या ट्विट फॅमिलीमुळे तिच्या मावशीला वाचवण्यासाठी मदत झाल्याने तिने एक पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. सर्वांना अशीच मदत करा असे आवाहनही तिने केले आहे. भूमीने तिच्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘माझ्या संपूर्ण ट्विटर फॅमिलीचे आभार. माझ्या मावशीला मदत मिळाली. माझ्यापर्यंत पोहचलेल्या सर्वांचे आभार, मागच्या ३ आठवड्यात घडलेल्या घटनांमुळे मी भारावून गेले आहे. मी तुमचे आयुष्यभर ऋणी राहीन. जितक्या लोकांना मदत करता येईल तितक्या लोकांना मदत करत राहू’, असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

- Advertisement -

कोरोनाच्या या महामारीत अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या सोशल मीडियावरुन लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे. अनेक गरजू रुग्णांच्या बेड,औषधे,प्लाझ्मा,ऑक्सिजनसाठी ते त्यांच्या सोशल मीडियावरुन आवाहन करत आहेत. अनेक मराठी तसेच बॉलिवूड कलाकार रुग्णांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अनेकांनी सरकारला आर्थिक मदतही केली आहे.


हेही वाचा – कोरोना संकटात लोकांच्या हिंमतीचे कौतुक करत सुश्मिता सेनची भावनिक पोस्ट

 

 

- Advertisement -