घरताज्या घडामोडी30Years of SRK: शाहरुख खानची सिनेसृष्टीत ३० वर्षे, शेअर केली भावूक...

30Years of SRK: शाहरुख खानची सिनेसृष्टीत ३० वर्षे, शेअर केली भावूक पोस्ट

Subscribe

आपल्या प्रवासात मागे वळून पाहताना शाहरुख झाला थोडा भावूक

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला (Shah Rukh Khan) सिनेसृष्टीत पदार्पण करुन तब्बल ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. शाहरुखने ऋषि कपूर आणि दिव्या भारती या दिग्गज स्टॉर्ससोबत आपल्या करिअरला सुरुवात केली होती. या ३० वर्षात शाहरुखने अनेक दर्जेदार सिनेमा,उत्तम भूमिका प्रेक्षकांसमोर सादर केल्या. आज अनेक जण शाहरुखनचा आदर्श समोर ठेवून आपल्या करिअरची सुरुवात करत आहे. मागच्या ३० वर्षांपासून भरभरुन प्रेम देणाऱ्या आपल्या फॅन्सचे किंग खानने ट्विट करुन आभार मानले आहेत. आपल्या प्रवासात मागे वळून पाहताना शाहरुख थोडा भावूक झाला. सोशल मीडियावरही 30Golden Years of SRK ट्रेंड होत आहे. (30 Years of SRK: Shah Rukh Khan 30 years in Cineworld, shared a passionate post)


‘मागचे ३० वर्ष तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात. तुमच्या प्रेमामुळे मी आजही काम करत आहे. तुमचे मनोरंजन करण्यात मी माझे अर्धे आयुष्य घालवले. वाटले यासगळ्यातून थोडा वेळ काढून सगळ्यांनी गप्पा मारू. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप आभार. उद्या वेळ काढून तुमच्याशी आणखी गप्पा मारेल’, असे म्हणत शाहरुखने ट्विटच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

शाहरुख खान अनेक कलाकारांसाठी आदर्श ठरला आहे. मात्र शाहरुखला सिनेसृष्टीत येण्यासाठी कोणताही गॉडफादर नव्हता. त्याने स्वत:च्या जिवावर आज बॉलिवूडमध्ये स्वत:चे नाव कमावले आहे. छोट्या पडद्यावर सुरुवातील निगेटिव्ह भूमिका साकारणारा शाहरुख सिनेमाचा नायक होऊन अनेक तरुण तरुणींच्या गळ्यातीला ताईत बनला. शहारुख सारखा कलाकार बॉलिवूडमध्ये आतापर्यंत झालेला नाही. शहारुखला ऋतिक रोशन सारखा डान्स किंवा सलमान खान सारखी दबंग स्टाईल करता येत नसेल पण शाहरुख खानसारखा रोमान्स कोणीच करु शकत नाही. शाहरुखने आतापर्यंतचा त्याची प्रत्येक भूमिका मनापासून केली आहे. त्यामुळेच शहारुखचे प्रत्येक सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात.


हेही वाचा – शबाना आझमी यांना घरपोच मद्य मागवणं पडलं महाग

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -