मराठी वाहिनीवरील ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अविनाश नारकर, ऋजुता देशमुख, आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेत आहे. ह्या मालिकेची टॅग लाईनच आहे ‘प्रत्येक जोडी जुळत नसते’. ह्या मालिकेतील नायक नायिका विरुद्ध दृष्टिकोन असलेल्या दोन व्यक्ती आहेत.
View this post on Instagram
वेदांत हा एक सुप्रसिद्ध तरुण, प्रस्थापित उद्योगपती आहे तो स्त्रीपेक्षा पुरुषांच्या सहवासाला प्राधान्य देतो कारण त्याचा असा विश्वास आहे की पुरुष स्त्रीपेक्षा अधिक सक्रिय, कार्यक्षम, तीक्ष्ण आणि मेहनती आहे. तर अमुल्याला डॉक्टर बनण्याची इच्छा असली तरी तिला हिमोफोबिया आहे. ती प्रेमळ, स्वैच्छिक, टॅलेंटेड आणि विनोदी असून ही तिच्या व्यक्तिमत्त्वाची मजबूत बाजू आहे.
हेही वाचा :
Mate Gala 2023 : प्रियंका चोप्राची पती निकसोबत शानदार एन्ट्री