घरमनोरंजनSAB TV च्या सेटवर कोरोनाचा कहर, ३९ जणांना झाली कोरोनाची लागण

SAB TV च्या सेटवर कोरोनाचा कहर, ३९ जणांना झाली कोरोनाची लागण

Subscribe

"वागले की दुनिया" मधील कलाकारांसह मालिकेच्या टीम मेंबर्सना कोरोणाची लागण झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असतांना मात्र दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट आता जागोजागी पसरत आहे. अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. अशातच चित्रपट सृष्टीलाही उतरती कळा लागली आहे. कोरोनाची लागण आता सिनेजगतातील अनेक लोकांना झाली आहे. सब टीव्ही वरील सुप्रसिद्ध मालिका “वागले की दुनिया” मधील कलाकारांसह मालिकेच्या टीम मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. एकूण ३९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

- Advertisement -

मालिकेतील मुख्य कलाकार सुमित राघवन, परिवा प्रणति, भारती आचरेकर तसेच बाल कलाकार चिन्मयी साळवी, शीहान कपाही यांना कोरोनाची लागण झाली आहे.दरम्यान या मालिकेचे चित्रीकरण सध्या थांबवण्यात आले आहे. फक्त १० दिवस मालिकेचे पुढील भाग प्रसारित होऊ शकतील इतकं चित्रीकरण करून ठेवलंय. तसेच चित्रीकरणाला पुन्हा कधी सुरवात होईल हे अद्याप कळू शकले नाही.

यापूर्वीही इंडियन फिल्म आणि टीव्ही प्रोड्यूसर्स काउंसिलचे टिव्ही विंगचे चेयरमेन ‘जे डी मजीठिया’ यांच्या अंतर्गत सब टिव्ही वर प्रसारित होणारी “भाकरवडी” मालिकेच्या सेट वरील एका क्रू मेंबर्सचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला होता. याघटने नंतर “भाकरवडी” ही मालिका बंद करण्यात आली होती.

- Advertisement -

हे हि वाचा- फोर्ब्स च्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत किम कार्दशियनची वर्णी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -