हिंदी टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहराबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका ४० वर्षीय महिलेने विश्वासघात केल्या प्रकरणात करणवीर बोहरा विरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. ओशिवारा पोलिस ठाण्यात करणवीर बोहरासोबत इतर ६ जणांवर विश्वासघात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करणवीर बोहरा विरोधात गुन्हा दाखल
हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेता करणवीर बोहरा विरोधात ४० वर्षीय महिलेने पैश्यांबाबत विश्वासघात केल्या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. या महिलेने सांगितल्याप्रमाणे, करणवीर बोहराने तिच्याकडून १.९९ करोड रूपये उधार घेतले होते आणि ते २.५% व्याजाने परत करणार असं सांगितले होते.
View this post on Instagram
त्या महिलेच्या मते करणवीर बोहराने आत्तापर्यंत फक्त १ करोड परत केले आहेत. बाकीचे पैसे तो परत करत नाही. तिने सांगितल्याप्रमाणे जेव्हा तिने पैसे परत करायला सांगितलं तेव्हा करण आणि त्याच्या पत्नीने त्या महिलेसोबत गैरव्यवहार केला तसेच तिला मारण्याची सुद्धा धमकी दिली. महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी करणसह अजून ६ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांचा तपास सुरू
करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी टीजेला आता पोलिस स्टेशनमध्ये आपली बाजू मांडण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलावले आहे. तसेच आता पोलिस सगळ्या केसची व्यवस्थित तपासणी करतील.