5 Years of Dear Zindagi: शाहरुखने आलियाला दिला होता स्टूपिड बनण्याचा सल्ला, वाचा मजेदार किस्सा

२५ डिसेंबर २०१६मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

5 Years Of Dear Zindagi: Shahrukh khan alia bhatt starer Dear Zindagi movie complete 5 years
5 Years Of Dear Zindagi: शाहरुखने आलियाला दिला होता स्टूपिड बनण्याचा सल्ला, वाचा मजेदार किस्सा

आयुष्य सकारात्मकतेने जगा असा सल्ला देणारा ‘डिअर जिंदगी’ (Dear Zindag)  सिनेमा गौरी खान,करण जोहर आणि गौरी शिंदे यांनी प्रेक्षकांसाठी आणला होता. या सिनेमात अभिनेता शाहरुख आणि अभिनेत्री आलिया भट प्रमुख भूमिकेत होते. पहिल्यांदा आलिया आणि शाहरुख एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसले होते. या सिनेमाला आता पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. (5 Years Of Dear Zindagi) आजही हा सिनेमा अनेकांना जगण्यासाठी नवी प्रेरणा देणार आहे. २५ डिसेंबर २०१६मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आयुष्य सकारात्मक आणि आशावादी करणे हाच या सिनेमाचा मुख्य उद्देश होता.

डिअर जिंदगी या सिनेमात पहिल्यांदा शाहरुख आणि आलियाची जोडी एकत्र दिसली. दोघांनी सिनेमात फार मजा केली आहे त्यांची झक्कास केमिस्ट्री सिनेमा पाहताना आपल्याला वेळोवेळी दिसून येते. सिनेमात शाहरुख सोबत काम करण्यासाठी आलिया भट्ट फार उत्साही होती. सिनेमाच्या वेळी शाहरुखने आलियाला दिलेल्या टिप्स ती आजही फॉलो करताना दिसते.

आलियाने एका मुलाखतीत शाहरुख सोबतचा किस्सा सांगितला होता. आलिया म्हणाली होती,आयुष्यात रिस्क घेणे फार महत्त्वाचे आहे. एक कलाकार असल्याने आपण जोवर काम करत नाही तोवर आपल्याला आपण कोणत्या गोष्टीसाठी सक्षम आहोत हे कळत नाही. रिक्स घेण्यात कोणताही सेंस नसतो पण रिक्स घ्यावी लागते. शाहरुख आलियाला म्हणाला होता की ‘रिस्क घ्या आणि कधी कधी बेकारही व्हा. फक्त काम करताना ते काम स्टुपिड म्हणून करा आणि काय माहित ते काम चांगलेही होईल’.

गौरी शिंदे हिने सिनेमाचे दिग्दर्शनच नाही सिनेमाचे लिखाण देखील केले होते. एका मुलाखतीत गौरीने सिनेमा लिहिणे सोपे होते पण सिनेमा तयार करणे कठीण असल्याचे सांगितले होते. एका मुलीला आयुष्यात खूप काही करायचे आहे परंतु तिला संधी मिळत नाही. आयुष्याला घेऊन गोंधळलेली कन्फ्यूज मुलगी जिचं म्हणण तिच्या आई वडिलांना देखील समजले नाही अशा मुलीची गोष्ट सिनेमात दाखवण्यात आली होती.

गुंतागुंतीच्या आयुष्यात तिची भेट होते शाहरुख खानशी आणि त्या मुलीचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींत आनंद शोधून त्यातून पॉझिटिव्ह कसं रहायच हे तिला कळते. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसली तर लोकांची मने जिंकण्यात सिनेमा नक्कीच यशस्वी ठरला आहे.


हेही वाचा – सोनाक्षी सिन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार ; खान कुटूंबाची सून होणार ?