घरमनोरंजनमिलिंद सोमणच्या फिटनेस पुढे तरुणाई पडेल फिकी !

मिलिंद सोमणच्या फिटनेस पुढे तरुणाई पडेल फिकी !

Subscribe

भिनेता मिलिंद सोमण आपल्या फिटनेसची विशेष काळजी घेतो हे तर सर्वांनाच माहिती आहे. तो किती फिटनेस फ्रिक आहे हे काही नव्याने सांगयची गरज नाहीये.

अभिनेता,मॉडल मिलिंद सोमण (milind soman) सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असतो. देशभरात त्याने त्याच्या फिटनेसच्या जोरावर भला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आह. यासोबतच मिलिंदने देशातील पहिला पुरुष सुपर मॉडल म्हणून ख्याती मिळवली आहे. मिलिंदने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती पण आज मिलिंद फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जातो. मिलिंदच्या फिटनेसचा लाखो चाहता वर्ग आहे. मिलिंद बऱ्याच वेळा सोशल मीडियावर त्याच्या व्यक्तीगत आयुष्यासोबतच अनेक फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ इतकच नाही तर वर्क आऊट संबधित टिप्स तो शेअर करताना दिसतो. दरम्यान, मिलिंदने नुकताच एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. या फोटोमध्ये मिलिंद शर्टलेस दिसतं आहे. तर, व्हिडीओत मिलिंद पुशअप्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत मिलिंदने ४० पुशअप केले आहेत. “जेव्हा मी म्हणतो की मला दिवसभर व्यायाम करायला वेळ मिळाला नाही, तर मी त्यातून १ मिनिट तर नक्कीच काढू शकतो!“बऱ्याच वेळा मला तेच पाहिजे – ६० सेकंदात किती? वेळ मिळत नाही, जागा नाही, उपकरने नाही हे कारण नाही, तुमच्या शरीराचे वजन उचलण्यासाठी सक्षम असणे पुरेसे आहे. एका मिनिटात पुशअपची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही ध्येयाची ही चांगली सुरुवात असते,” अशा आशयाचे कॅप्शन देत मिलिंदने चक्क 60 सेकंदात 40 पुशअप केले आहेत. मिलिंद अनेकदा त्याच्या चाहत्यांन फिटनेसचे धडे देत असतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

- Advertisement -

दरम्यान, मिलिंद सोशल मीडियावर नेहमीच फिटनेसचे व्हिडीओ शेअर करतो. मिलिंद ५५ वर्षांचा असून ही एवढा फिट आहे. त्याला पाहून फिट राहण्याची प्रेरणा अनेकांना मिळते असे त्याचे चाहते नेहमीच म्हणतात.अभिनेता मिलिंद सोमण आपल्या फिटनेसची विशेष काळजी घेतो हे तर सर्वांनाच माहिती आहे. तो किती फिटनेस फ्रिक आहे हे काही नव्याने सांगयची गरज नाहीये.


हे हि वाचा – गाझियाबाद व्हिडीओ प्रकरण: स्वरा भास्कर,ट्विटर इंडिया हेडवर गुन्हा दाखल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -