Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 6 जागतिक दर्जाचे अ‍ॅक्शन डायरेक्टर्स करणार 'जवान'चे धमाकेदार अ‍ॅक्शन सीक्वेन्स

6 जागतिक दर्जाचे अ‍ॅक्शन डायरेक्टर्स करणार ‘जवान’चे धमाकेदार अ‍ॅक्शन सीक्वेन्स

Subscribe

अ‍ॅक्शन डायरेक्टर, स्पिरो रझाटोस, यानिक बेन, क्रेग मॅकक्रे, केचा खमफाकडी, सुनील रॉड्रिग्स आणि अनल अरासू होणार सहभागी

सुपरस्टार शाहरुख खान बहुप्रतिक्षित ‘जवान’ द्वारे जगभरातील त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना एक मोठे सरप्राईज देणार आहे. चित्रपटाच्या आकर्षक प्रीव्यू आणि गाण्यांनी आधीच लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवले आहे, चित्रपटाचे अ‍ॅक्शन सीक्वेन्स देखील संस्मरणीय असतील. निर्मात्यांनी जवानच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्सला भव्य बनवण्यासाठी टॉप क्लास अ‍ॅक्शन डायरेक्टर्सची संपूर्ण फौज नियुक्त केली ज्यामध्ये 6 मोठ्या अ‍ॅक्शन डायरेक्टर्सचा समावेश आहे.

निर्मात्यांनी जवानच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्सला भव्य बनवण्यासाठी टॉप क्लास अॅक्शन डायरेक्टर्सची संपूर्ण फौज नियुक्त केली ज्यामध्ये 6 मोठ्या अॅक्शन डायरेक्टर्सचा समावेश आहे.जवळच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “जवानच्या अॅक्शनला 6 सर्वात मोठ्या अॅक्शन डायरेक्टर, स्पिरो रझाटोस, यानिक बेन, क्रेग मॅकक्रे, केचा खमफाकडी, सुनील रॉड्रिग्स आणि अनल अरासू यांनी कोरिओग्राफ केले आहे. त्यांनी जागतिक स्तरावर काही सर्वोत्तम अॅक्शन सीक्वेन्स तयार केले आहेत. “जवानसाठी कोरिओग्राफ केलेल्या अॅक्शनमध्ये विविध प्रकारच्या अॅक्शन फॉरमॅट्सचा समावेश आहे, ज्यामध्ये हँड टू हँड कॉम्बॅट, थरारक बाइक सीक्वेन्स, थरारक ट्रक आणि कार चेस यांचा समावेश आहे.

- Advertisement -

एटली दिग्दर्शित जवान, गौरी खान निर्मित आणि गौरव वर्मा सह-निर्मित, रेड चिलीज एंटरटेनमेंट सादरीकरण आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 


- Advertisement -

हेही वाचा :

सलमानचं टक्कल पाहून युजर्सने उडवली खिल्ली

- Advertisment -