Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Drug case : ड्रग्ज प्रकरणी बाहुबली फेम 'राणा दग्गुबाती'ची ७ तास चौकशी

Drug case : ड्रग्ज प्रकरणी बाहुबली फेम ‘राणा दग्गुबाती’ची ७ तास चौकशी

राणा दग्गुबातीसह एकूण १२ जणांना चौकशीसाठी नोटीस जारी पाठवली होती.

Related Story

- Advertisement -

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटीचे ड्रग्ज प्रकरणात नावे समोर आली आहे. तसेच दक्षिण सिनेसृष्टीतील काही बड्या अभिनेत्यांची आणि अभिनेत्रींची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहे. बाहुबली फेम राणा दग्गुबाती’ची ड्रग्ज प्रकरणात ७ तास चौकशी करण्यात आली आहे. तब्बल ७ तास चौकशी केल्यानंतर राणाला ईडीने कार्यालयातून सोडलं आहे. ४ वर्ष जुन्या ड्रग्ज प्रकरणात झालेल्या आर्थिक देवाणघेवाणवरुन ईडीने राणा दग्गुबातीला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. या प्रकरणाची एकूण ईडीने ७ तास चौकशी केली आहे.

दाक्षिणात्य सुपस्टार राणा दग्गुबातीला ईडीने समन्स बजावल्यामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ माजली होती. तसेच राणाच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. यापुर्वी ईडीकडून ३ सप्टेंबरला अभिनेत्री रकुलप्रीत हीची ५ तास चौकशी करण्यात आली होती. ईडीने रकुलप्रीत, राणा दग्गुबातीसह एकूण १२ जणांना चौकशीसाठी नोटीस जारी पाठवली होती. यापुर्वी २०१७ मध्येही विशेष पथकाने ड्रग्जप्रकरणी या १२ सेलिब्रेटींची चौकशी केली होती. यामध्ये मनी लॉन्ड्रींगचे प्रकरण समोर आलं होते यामुळे राणाला या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने बोलावले होते.

- Advertisement -

कलाकरांना चौकशीसाठी समन्स

सर्व कलाकारांना वेगवेगळ्या तारखेनुसार ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रकुल प्रीत सिंह 6 सप्टेंबर, राणा दग्गुबाती 8 सप्टेंबर, रवि तेजा 9 संप्टेंबर, पुरी जगन्नाथ (दिग्दर्शक) 31 सप्टेंबर या तारखे प्रमाणे वेळेत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहा असा समन्स बजावण्यात आला आहे. तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने 2017मध्ये 30 लाख रुपयांचे आंमली पदार्थ जप्त केले होते. यानंतर त्यांनी तब्बल 12गुन्हे दाखल केले होते. यापैकी 11 प्रकरणामध्ये आंमली पदार्थ तस्करांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -