घरताज्या घडामोडी83 Box Office Collection Day1: पहिल्याच दिवशी ८३ची बॉक्स ऑफिसवर १५ कोटींची...

83 Box Office Collection Day1: पहिल्याच दिवशी ८३ची बॉक्स ऑफिसवर १५ कोटींची कमाई

Subscribe

सिनेमा भारतातील जवळपास ३ हजार ७४१ थिएटर्समध्ये प्रदर्शित

देशाच्या इतिहासातील सोनेरी क्षण म्हणजे देशाने १५ जून १९८३ साली जिंकलेला पहिला वर्ल्ड कप. याच वर्ल्ड कपची कहाणी सांगणारा ८३ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट होणार यात काहीच शंका नव्हती. सिनेमाने पहिल्याच दिवश बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. २४ डिसेंबरला सिनेमा भारतातील जवळपास ३ हजार ७४१ थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. क्रिकेटर कपिल देव यांच्या जीवनावर आधारित आणि १९८३ च्या वर्ल्डकपची कहाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सिनेमाच्या माध्यमातून अनुभवता आली. सिनेमाने पहिल्या दिवशी तब्बल १५ कोटींची कमाई करत नवा रेकॉर्ड बनवला आहे. नाताळ आणि विकेंड असल्याने प्रेक्षकांनी सिनेमागृहात तुफान गर्दी करत सिनेमाचा प्रचंड प्रतिसाद दिला आहे. विकेंडला सिनेमा आणखी कमाई करण्याची शक्यता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

- Advertisement -

सिनेमात अभिनेता रणवीर सिंह याने क्रिकेटर कपिल देव यांची मुख्य भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री दीपिका पादुकोन हिने कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांची भूमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे सिनेमात मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे आणि चिराग पाटील यांनी देखील मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता एमी विर्क, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकारही आहेत.

८३ हा सिनेमा क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरला आहे. १९८३चा वर्ल्ड कप आणि कपिल देव यांच्या जीवनावर आधारित सिनेमा करण्यासाठी अभिनेता रणवीर सिंहने देखील प्रचंड मेहनत घेतली. त्याची संपूर्ण मेहनत सिनेमा पाहताना दिसून येते. रणवीरने हुबेहूब कपिल देव यांची भूमिका साकारली.

- Advertisement -

हेही वाचा – 83 Movie : सोशल मीडियावर ‘#Boycott 83’ ट्रेंडिंगवर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -