83 Box Office Collection : ’83’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धमाका ; चार दिवसांत 54.29 कोटींची कमाई

83 Box Office Collection: The much awaited movie '83' grossed Rs 54.29 crore in four days
83 Box Office Collection : '83' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धमाका ; चार दिवसांत 54.29 कोटींची कमाई

बहुप्रतिक्षित ’83’ हा सिनेमा २४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस आला.या सिनेमा चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस आला असून, ’83’ चा बॉक्स ऑफीसवर धमाका सुरु आहे. अवघ्या चार दिवसांतच ५४.२९ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.या चित्रपटाला संपूर्ण भारतातून सकारात्मक प्रतिसाद येत आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी १२.६४ कोटींची कमाई केली,तर दुसऱ्या दिवशी १६.९५ तर तिसऱ्या दिवशी १७.४१ कोटींची कमाई केली.मात्र सोमवारी सिनेमाने ७.२९कोटींची कमाई केली असून, बॉक्स ऑफीसवर घसरण झाली.

देशाच्या इतिहासातील सोनेरी क्षण म्हणजे देशाने १५ जून १९८३ साली जिंकलेला पहिला वर्ल्ड कप. याच वर्ल्ड कपची कहाणी सांगणारा ८३ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट होणार यात काहीच शंका नव्हती. सिनेमाने पहिल्याच दिवश बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. २४ डिसेंबरला सिनेमा भारतातील जवळपास ३ हजार ७४१ थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. क्रिकेटर कपिल देव यांच्या जीवनावर आधारित आणि १९८३ च्या वर्ल्डकपची कहाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सिनेमाच्या माध्यमातून अनुभवता आली.


हेही वाचा – महिलेचं ओंगळवाणं प्रदर्शन ‘अनुराधा’ सिरीजचा पोस्टर पाहून रुपाली चाकणकर भडकल्या