बॉलिवूड अभिनता अक्षय कुमार नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. दरम्यान, अक्षय आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकताच अक्षयने स्वतःचा एक फॅशन ब्रँड लॉन्च करणार असल्याची माहिती दिली आहे. या ब्रँडचे नाव फोर्स IX असे असणार आहे. सोशल मीडियावरुन याबाबत खुलासा करत अक्षयने त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पहिल्यांदाच अक्षय कुमारचे घर दिसत आहे. त्याने सांगितलं की, त्याने पहिल्यांदाच त्याच्या घरामध्ये मुलाखत शूट केली आहे.
अक्षय सुरु करतोय फॅशन ब्रँड
या व्हिडीओमध्ये अक्षय मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला म्हणतोय की, “तुला माहित आहे ही माझी पहिली मुलाखत आहे. जी माझ्या घरामध्ये होतेय. आत्तापर्यंत मी घरामध्ये एकही मुलाखत घेतली नाही. त्यानंतर अक्षयला मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की त्याने ब्रँडचे नाव फोर्स नाईन का ठेवले? तेव्हा तो म्हणाला, ‘सगळ्यात मोठी शक्ती असते जी संपूर्ण विश्वाला नियंत्रित करते. दुसरी शक्ती म्हणजे मदर नेचर. तिसरे म्हणजे आपले सशस्त्र दल. माझे वडील सशस्त्र दलात होते आणि माझा भाग्यवान क्रमांक 9 आहे. त्या दिवशी माझा वाढदिवस असतो. त्यामुळे मी दोन्ही एकत्र केले. मला मनापासून ते करायचे आहे. जर तुम्ही खाली बघितले तर तिथे Engineered With Emotion लिहिलेले दिसेल.”
View this post on Instagram
त्यानंतर अक्षयने त्याच्या कपड्यांचा वॉर्डरोब दाखवला. तो म्हणाला की, “जेव्हा त्याला शक्य असल्यावर तो दररोज ट्रॅक पँट किंवा हुडी घालतो. पातळ टी-शर्ट घालतो. ज्यामध्ये प्रत्येकाला मोकळे मोकळे आणि आरामदायी वाटते. त्यामुळे त्याला असेच काहीतरी बनवायचे आहे, ज्यात रंगाबरोबरच आरामही आहे. ज्यामध्ये तुम्ही स्वतःसारखे वाटतात.
अक्षय म्हणतो की, तरुण डिझायनर्सची टीम त्याच्याशी जोडली गेली आहे, जी त्यावर भावनिकरित्या काम करणार आहेत. अक्षयने जे स्वतः परिधान केले तरच तो इतरांसाठी आणणार आहे. हे सर्व कपडे फक्त भारतातच बनवले जातील.”
हेही वाचा :