स्टँडअप कॉमेडियन ख्याली सहारनवर बलात्काराचा गुन्हा, 25 वर्षीय तरुणीची तक्रार

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन ख्याली सहारनवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 25 वर्षीय तरुणीने राजस्थानच्या मानसरोवर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. नोकरी देण्याचे आमिष दाखवून ख्याली सहारनने या तरुणीला हॉटेलमध्ये नेले आणि तिच्या बलात्कार केला. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आता मानसरोवर पोलिसांनी ख्याली सहारनवर गुन्हा दाखल केला.

उपनिरीक्षक संदीप यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पीडित महिलेच्या तक्रारीवरुन कॉमेडियन ख्याली सहारनवर आयपीसी कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरु आहे.

नोकरीचे आमिष दाखवून केला बलात्कार

पीडित माहिला श्रीगंगानगर येथील रहिवासी आहे. या महिलेला नोकरीची गरज असल्याने गुटखा फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणार्‍या आणखी एका महिलेसह तिला नोकरी मिळवून देण्यासाठी मागील एक महिन्यापासून ख्याली सहारनच्या संपर्कात आली होती. सोमवारी ख्यालीने त्या दोघींना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये बोलवले. त्यावेळी त्याने हॉटेलमध्ये दोन रूम बुक केल्या होत्या. त्यावेळी ख्यालीने स्वतः बिअरचे सेवन करत त्या महिलांनाही जबरदस्तीने पिण्यास सांगितलं. त्यानंतर, त्यातील एक महिला रूममधून निघून गेली. तेव्हा ख्यालीने दुसऱ्या महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. दरम्यान, आता ख्याली सहारनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देखील सुरु आहे.

 


हेही वाचा :

पंजाबी अभिनेता अमन धालीवालवर जीममध्ये अज्ञात व्यक्तीकडून हल्ला; व्हिडीओ व्हायरल