राखी सावंतच्या आयुष्यावर येणार बायोपिक, स्वतःच साकारणार मुख्य भूमिका

ड्रामा क्वीन राखी सावंत मागील अनेक दिवसांपासून तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीच्या वैवाहिक आयुष्यात अनेक तांडव सुरु आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राखीने स्वतःची अभिनय कार्यशाळा सुरु केली असून आपल्या करिअरवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी काळात राखी सावंतवर एक चित्रपट तयार केला जाणार आहे. ज्यात ती स्वतः मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात राखी महिला पोलीसाची भूमिका साकारणार आहे. याबाबत राखी सावंतचा भाऊ राकेश सावंतने खुलासा केला आहे.

राखी सावंतच्या जीवनावर आधारित चित्रपट होणार प्रदर्शित

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखी सावंतच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या नावाची घोषणा राकेश सावंतने केली आहे. या चित्रपटाचं नाव ‘रावडी राखी’ असं असणार आहे. यामध्ये ती महिला पोलीसची भूमिका साकारणार आहे. याचे दिग्दर्शन स्वतः राखीचा भाऊ करणार असून त्याची निर्मिती गौरव करणार आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राकेश म्हणाला की, हो मी हा चित्रपट तयार करणार आहे. राखी एक रावडी आहे. जो तिच्या रस्त्यात अडथळे निर्माण करतो ती त्याला सोडत नाही. तसेच आदिलबाबत बोलताना राकेश म्हणाला की, “आदिल खानविरोधात सुरु असलेला खटला फक्त तिचाच नाही. ती एका मोठ्या कारणासाठी लढत आहे.”

दरम्यान, सध्या राखी तिचा पती आदिलला तुरुंगात पाठवल्यामुळे चर्चेत आहे. राखीने पती आदिलवर बलात्कार, मारहान, धोका आणि विवाहबाह्य संबंध हे आरोप केले आहेत. आदिल सध्या म्हैसूर तुरुंगामध्ये आहे. राखी आणि आदिल यांचा मे 2022 मध्ये लग्न झाले होते. ज्याची घोषणा तिने जानेवारी 2023 मध्ये केली होती.


हेही वाचा :

कॉमेडी सिरीज ‘हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय’चा ट्रेलर झाला प्रदर्शित