Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन अमृता राव आणि आरजे अनमोलने केले होते बजेट वेडींग

अमृता राव आणि आरजे अनमोलने केले होते बजेट वेडींग

Subscribe

‘विवाह’ आणि ‘मैं हू ना’ सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री अमृता राव सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अमृता चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नसली तरी तिच्या खासगी आयुष्याबाबत अनेक अपडेट ती तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अमृताने पती आरजे अनमोलसोबत ‘कपल ऑफ थिंग्ज’ हे पुस्तक लाँन्च केलं होतं. हे पुस्तक या दोघांनी मिळून लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील गोष्टी चाहत्यांशी शेअर केल्या आहेत. शिवाय सध्या हे दोघे ‘यही वो जग है’ ही सीरिज चालवत आहेत. ज्यामध्ये तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित किस्से आणि ठिकाणांशी संबंधित आठवणी चाहत्यांसोबत शेअर करतात.

साध्या पद्धतीने झालं होतं अमृता-अनमोलचं लग्न

Amrita Rao Shares Unseen Photos From Her Wedding With RJ Anmol- Checkout!

- Advertisement -

खरंतर, अमृता आणि अनमोलने 2014 मध्ये गुपचूप लग्न केलं होतं. मात्र, त्याचा खुलासा त्यांनी 2016 मध्ये केला होता. अमृता राव आणि आरजे अनमोल यांचं लग्न 15 मे 2014 रोजी झालं होतं.

Amrita Rao, RJ Anmol finally share pics from secret 2014 wedding. See here  | Bollywood - Hindustan Times

- Advertisement -

दोघांनी 9 वर्षांपूर्वी पुण्यातील कात्रज येथील इस्कॉन मंदिरात गुपचूप लग्न केले होते. त्याच्या लग्नात केवळ 1 लाख 50 हजार रुपये खर्च झाले होते. या खर्चामध्ये लग्नाचे कपडे, लग्नाचे ठिकाण, प्रवास आणि इतर खर्चाचा समावेश होता.

लग्नाच्या कपड्यांसाठी खर्च केले होते 3000 रुपये

लग्नासाठी अमृताने कोणताही महागडा डिझायनर लेहेंगा घातला नव्हता. तर अनमोलने देखील कोणतीही खास शॉपिंग केली नव्हती. अमृताने तिच्या लग्नासाठी मुंबईतील दादर येथील एका दुकानातून लाल साडी खरेदी केली होती. तर स्वतःचा मेकअपही तिनेच केला होता. अनमोलने देखील लग्नासाठी साधा पिवळा कुर्ता विकत घेतला होता.

 


हेही वाचा :

हेल्मेटशिवाय प्रवास केल्याने ट्रोल झालेल्या बिग बींनी मागितली माफी

- Advertisment -