घरमनोरंजनवेब सीरिजमधून भारतीय सैनिकांचा अपमान केल्याच्या प्रकरणात एकता कपूरविरोधात गुन्हा दाखल

वेब सीरिजमधून भारतीय सैनिकांचा अपमान केल्याच्या प्रकरणात एकता कपूरविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

एका वेब सीरिजच्या माध्यमातून सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा अपमान केल्याबद्दल एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रसिद्ध चित्रपट आणि हिंदी टेलिव्हिजनची निर्माती एकता कपूर आणि तिची आई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने सध्या सर्वत्र चर्चांणा उधाण आलं आहे. याचं कारण म्हणजे एका वेब सीरिजच्या माध्यमातून सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा अपमान केल्याबद्दल एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेगूसराय येथील जिल्हा न्यायालयात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. जे शुक्रवारी म्हणजेच आज मुंबईमध्ये पाठवण्यात येईल.तक्रार दाखल करणाऱ्याने सांगितले आहे की, भारतीय सैनिकांचा घोर अपमान केल्यामुळे ट्रिपल एक्स (xxx) वेब सीरिज बनवणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळायला हवी.

भाजपा नेता आणि माजी सैनिक यांनी ही तक्रार दाखल केली असून ट्रिपल एक्स (xxx) मधील सीझन-2 मध्ये भारतीय सैनिकांचा घोर अपमान करण्यात आला आहे. असं म्हटलं आहे. याबद्दल बेगुसराय न्यायालयाचे वकील ऋषिकेश पाठक यांनी सांगितले की, वेब सिरीजमध्ये असं दाखण्यात आलंय की, जेव्हा भारतीय सैनिक त्यांच्या ड्युटीवर असतात तेव्हा त्या सैनिकांची पत्नी घरी तिच्या मित्रांना बोलवते आणि त्यांना सैनिकाची वर्दी घालते आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवते. या वेब सीरीजमुळे सैनिकांच्या मनाचे खच्चीकरण्याचा प्रयत्न चालू आहे. याप्रकरणी अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संदर्भात एकता कपूर आणि तिच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

वकील पुढे म्हणाले की, एकता कपूरला जामिनासाठी कोर्टाकडून संधी देण्यात आली होती. पण त्यांनी ती गमावली. तक्रार दाखल करणाऱ्या भाजपा नेते शंभू सिंह यांनी सांगितले की, एकताने या वेब सिरीजमध्ये भारतीय सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल चुकीची प्रतिमा मांडली आहे. त्यामुळे तिने सर्व देशासमोर माफी मागायला हवी.


हेही वाचा :

श्रीरामांच्या योद्धा अवतारातील ‘आदिपुरुष’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -