घरमनोरंजन'चारचौघी' नाटकाच्या निमित्ताने दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींशी मनमोकळ्या गप्पा

‘चारचौघी’ नाटकाच्या निमित्ताने दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींशी मनमोकळ्या गप्पा

Subscribe

चाकोरी बाहेर जाऊन प्रचलित गोष्टींना नकार देतो तेंव्हा ते बंडखोर ठरतं. या नाटकाला बंडखोर म्हटलं गेलं.

  • संतोष खामगावकर

मराठी नाट्य सृष्टीमध्ये वेगवेगळ्या आशयाच्या नाटकांनी आजपर्यंत रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. पण काही नाटकं अशी असतात जी नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. त्याचप्रमाणे ‘चारचौघी’ हे नाटक सुद्धा अजूनही प्रेक्षकांच्या मनात ताजं तवानं आहे. हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षक भेटीसाठी रंगमंचावर येत आहे असं नाटकाचे दिगदर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले. नाटकातील चार स्त्रिया, पण त्या नेहमीच्या चारचौघींप्रमाणे नाहीत. एक वेगळा निर्णय घेणारी आई आणि वेगळे निर्णय घेणाऱ्या तिच्या तीन मुली आहेत. यांच्या भोवती फिरणाऱ्या या नाटकाची कथा आणि ह्या व्यक्तीरेखा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

चार स्त्रिया आहेत पण त्या नेहमीच्या चारचौघींप्रमाणे नाहीत. एक वेगळा निर्णय घेणारी आई आणि तिच्या तीन वेगळे निर्णय घेणाऱ्या मुली आहेत. यानिमित्ताने नाटकाच्या लेखकाने एका रचनेमधून खूप काही केलं होतं. म्हणजे कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, न्यायव्यवस्था, सामाजिक चळवळ या सगळ्या अंगांनी बदलणारी स्त्री, खंबीर स्त्री, वेगळा निर्णय घेणारी स्त्री… बरं ती काही कुणी सुपरवूमन नव्हती नं, ती हेच जीवन जगणारी होती. तिचे काही निर्णय चुकले असतील पण म्हणून तिच्या निर्णयाच्या हेतूविषयी तुम्ही शंका घेऊ शकत नाही. ते तिने तसे का घेतले ? ती कशाच्या विरोधात उभी राहिली ?… जेव्हा जेव्हा आपण का असा प्रश्न विचारतो, कशाच्या तरी चाकोरी बाहेर जाऊन प्रचलित गोष्टींना नकार देतो तेंव्हा ते बंडखोर ठरतं. या नाटकाला बंडखोर म्हटलं गेलं !… आणि ती बंडखोरी त्यांच्या विचारांनी , त्यांच्या कृतीने दाखवून देणारी होती. त्यामुळे ते काळाच्या पुढचं आहे असं म्हटलं गेलं. तर आता काळाच्या पुढे गेल्यानंतर मला पुन्हा एकदा तपासून बघावंसं वाटतंय. कि, आता ते पुढे गेलंय का? आज त्यात काय बदल झालेत? लिखाणाच्या-विचारांच्या दृष्टीने खरंच काही बदल झालेत का?… काही वेळा मला असं वाटलं की, काहीच बदल झाले नाहीत. काही बाबतीत डायमेन्शन बदललेत. अशा वेळी चेकइन म्हणतो ना, म्हणजे थिएट्रिकल चेकइन ,कन्टेन्टचं चेकइन पुन्हा एकदा नवीन पिढीसोबत करता येईल.

- Advertisement -

१५ ऑगस्ट १९९१ साली, म्हणजे आजपासून तब्बल ३१ वर्षांपूर्वी एक नाटक रंगभूमीवर अवतरलं होतं. प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित या नाटकाचं नाव होतं ‘चारचौघी’. नाव जरी ‘चारचौघी’ असलं तरी त्यातल्या त्या चारचौघी नेहमीच्या चौकटीतल्या चारचौघी नव्हत्या. त्या चारचौघींनी तत्कालीन समाजमनाला घुसळून काढलं, नातेसंबंधांवर विचार करायला भाग पाडलं. समीक्षकांनी तर ‘काळाच्या पुढचं नाटक’ अशीच त्याची गणना केली. नाटकाचे प्रयोगांवर प्रयोग होत गेले. प्रयोग हजारचा आकडा पार करून केंव्हा पुढे निघून गेले हे कळलंही नाही. सलग सात वर्षे हा सिलसिला चालू होता. याचं कारण आशयपूर्ण संहिता, संवाद आणि हे सारं प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारे ताकदीचे कलाकार

- Advertisement -

सुरुवातीच्या या कलाकारांच्या संचात दिपा लागू , वंदना गुप्ते, आसावरी जोशी, प्रतिक्षा लोणकर, सुनिल बर्वे अशा ताकदीच्या कलावंतांचा समावेश होता. नाटक जसजसं पुढे जायचं कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांच्या मनाची पकड घ्यायची. त्यातला वंदना गुप्तेंचा वीस मिनिटांचा फोन-कट सीन तर खिळवून ठेवणारा होता. त्या एका सीनसाठी पुन्हा पुन्हा नाटक पाहणारा दर्दी प्रेक्षकही या नाटकाला मिळाला. या यशात लेखक, कलाकार इत्यादी मंडळींचा वाटा तर होताच शिवाय एका एका व्यक्तींचाही सिंहाचा वाटा होता आणि ते म्हणजे नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा. आज पुन्हा तेच चंद्रकांत कुलकर्णी तीस वर्षांपूर्वीचं ‘चारचौघी’ मराठी रंगभूमीवर घेऊन आले आहेत. नाटकाची संहिता तीच आहे, काळाचे संदर्भही तेच, लेखक-दिग्दर्शकही तेच. बदललेत फक्त नेपत्थ्य, संगीत, डिझाइन्स आणि कलाकार. मात्र या नव्या संचात तेवढ्याच ताकदीच्या अचूक कलाकारांची निवड करायला चंद्रकांत कुलकर्णी विसरलेले नाहीत. कलाकारांच्या या नव्या संचात आपल्याला भेटणार आहे रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, श्रेयस राजे, निनाद लिमये, आणि पार्थ केतकर.

‘चारचौघी’ची घोषणा झाल्याझाल्या शुभारंभाचे सारे प्रयोग हाऊसफुल्ल झालेले आहेत. शिवाजी मंदिरसारख्या नाट्यगृहाला बाल्कनीतली धूळ झटकून, ती खुली करावी लागली आहे. दर्दी प्रेक्षक चांगलं नाटक कधीच विसरत नसतो , याची ग्वाहीसुद्धा या निमित्ताने मिळाली आहे. या निमित्ताने दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी ‘आपलं महानगरसोबत’ मनमोकळ्या गप्पा मारल्या. या तर जाणून घेऊ त्यांना हे नाटक पुन्हा का करावंसं वाटलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)


प्रश्न : आज एकतीस वर्षांनी पुन्हा ‘चारचौघी’ रंगभूमीवर आणावसं का वाटलं ?

उत्तर : हे नाटक पहिल्यांदा १९९१ साली रंगभूमीवर आलं. त्यानंतरची दहा वर्षं जर अभ्यासली तर दिसेल, त्या दहा वर्षांत वेगळ्या प्रकारची अनेक नाटकं एकापाठोपाठ एक येत गेली. पण दशकाच्या सुरुवातीला आलेलं चारचौघी सलग सात वर्षे चाललं. चारचौघी महत्वाचं नाटक ठरलं, ते त्याच्या आशयामुळे, परफॉर्मन्समुळे आणि दिग्दर्शनामुळे !… आणि त्याला पुन्हा पुन्हा पाहायला येणारा प्रेक्षकवर्ग मिळाला. सुरुवातीला वाटलं की, अरे हे चर्चानाट्य आहे, यात ठराविक नाट्यपूर्ण घटना नाहीयत, यात सो कॉल्ड असं काहीच नाही. याचं कसं होईल ?… पण त्याची गंम्मत अशी झाली की , प्रेक्षकांना ते आवडलं, समीक्षकांना आवडलं. आणि माहित नसेल तर आठवण करून देतो की, हे नाटक आल्यानंतर दोन वर्षांनी बी. ए. च्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश झाला. म्हणजे आशय-विषय, सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून हे नाटक महत्त्वाचं ठरलं. असंही म्हटलं गेलं की, हे काळाच्या पुढचं नाटक आहे. लेखकाने पुढचं व्हिजन दाखवलंय. महत्त्वाचे निर्णय आहेत. चार स्त्रिया आहेत पण त्या नेहमीच्या चारचौघींप्रमाणे नाहीत. एक वेगळा निर्णय घेणारी आई आणि तिच्या तीन वेगळे निर्णय घेणाऱ्या मुली आहेत. यानिमित्ताने नाटकाच्या लेखकाने एका रचनेमधून खूप काही केलं होतं. म्हणजे कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, न्यायव्यवस्था, सामाजिक चळवळ या सगळ्या अंगांनी बदलणारी स्त्री, खंबीर स्त्री, वेगळा निर्णय घेणारी स्त्री… बरं ती काही कुणी सुपरवूमन नव्हती नं, ती हेच जीवन जगणारी होती. तिचे काही निर्णय चुकले असतील पण म्हणून तिच्या निर्णयाच्या हेतूविषयी तुम्ही शंका घेऊ शकत नाही. ते तिने तसे का घेतले ? ती कशाच्या विरोधात उभी राहिली ?… जेव्हा जेव्हा आपण का असा प्रश्न विचारतो, कशाच्या तरी चाकोरी बाहेर जाऊन प्रचलित गोष्टींना नकार देतो तेंव्हा ते बंडखोर ठरतं. या नाटकाला बंडखोर म्हटलं गेलं !… आणि ती बंडखोरी त्यांच्या विचारांनी , त्यांच्या कृतीने दाखवून देणारी होती. त्यामुळे ते काळाच्या पुढचं आहे असं म्हटलं गेलं. तर आता काळाच्या पुढे गेल्यानंतर मला पुन्हा एकदा तपासून बघावंसं वाटतंय. कि, आता ते पुढे गेलंय का? आज त्यात काय बदल झालेत? लिखाणाच्या-विचारांच्या दृष्टीने खरंच काही बदल झालेत का?… काही वेळा मला असं वाटलं की, काहीच बदल झाले नाहीत. काही बाबतीत डायमेन्शन बदललेत. अशा वेळी चेकइन म्हणतो नं, म्हणजे थिएट्रिकल चेकइन ,कन्टेन्टचं चेकइन पुन्हा एकदा नवीन पिढीसोबत करता येईल.

बघ सोप्या भाषेत सांगायचं तर एकतीस वर्षांपूर्वी यातली पर्ण आज जी भूमिका करते, ती पूर्वी ती प्रतीक्षा लोणकर करत होती. ती तेंव्हा पंचविशीत होती आज ती पन्नाशीची आहे. वंदना गुप्ते ज्या पस्तिशीत होत्या त्या आज सत्तरीत आहेत. यातले दोन तीन नट तेंव्हा जन्मालाही आले नव्हते. तीन दशकं उलटली अन तरीही चारचौघी आज लोकांना कशा न कशासाठी तरी आठवतंय. तर हे पुन्हा बघण्यासाठी-अनुभवण्यासाठी म्हणून मी या नाटकाकडे बघतो. म्हणून त्या वेळी काळाच्या पुढचं समजलं गेलेलं हे नाटक, आज काळ पुढे आल्यानंतर आज त्याचं काय झालंय हे मला पाहायचंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chandrakant Kulkarni (@chandukul)

प्रश्न : अर्थात हे झालं एका दिग्दर्शकाचा दृष्टीकोण पण चारचौघी पुन्हा येणार हे कळल्यावर आज प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आहे?

उत्तर : मला आनंद आहे कि कोविडसारखं एवढं मोठं संकट आल्यानंतरही आणि मोठी गॅप पडूनही परत नाटक सुरु झालं. आज जिथे-जिथे अभरुचीसंपन्न प्रेक्षक आहेत तिकडून प्रतिसाद मिळतोय. ‘चारचौघी’ आम्ही करतोय म्हटल्यावर ज्याप्रकारचा प्रतिसाद मिळतोय, तुमच्याकडून ज्या प्रश्नांची सरबत्ती होतेय त्याचा आनंदच आहे. मला गेल्या तीन दिवसांपासून सारखे फोन येताहेत कि, आम्हाला ओपनिंगच्याच शोला यायचंय. हे नाटकाच्या दृष्टीने चांगलं लक्षण आहे. अनेक दिवसांनी ओपनिंगला शिवाजी मंदिरची बाल्कनी उघडलीय. लोकांनी चक्क रांगा लावल्यात तिकीट विन्डोला ! हे सगळं चांगलंच लक्षण आहे.

प्रश्न : चंदुदादा, हे चित्र बघितल्यावर काय वाटतं ?

उत्तर : माझ्याच नाही तर कुठल्याही चांगल्या नाटकाला जेंव्हा भरभरून प्रतिसाद मिळतो तेंव्हा मला आनंद वाटतो. आणि त्यातही माझं नाटक बघून घरी जाऊन लोकांनी पुन्हा जर दोन तास टीव्ही बंद केला तर मला निश्चितच आवडेल.

 

प्रश्न : नाटकातल्या कलाकारांबद्दल… त्यावेळच्या चारचौघी आता बदलल्यात, या चारचौघींची निवड कशाच्या आधारावर झाली ?

उत्तर : आपण काय करतोय आता, आपण माणसांविषयी बोलतोय आणि लेखकावर अन्याय करतोय. कारण त्या चार ताकदीच्या व्यक्तिरेखा त्याने लिहिल्या म्हणून त्या चार अभिनेत्री तिथे आहेत ना ?… आता चारचौघीतली ‘विद्या’ म्हटली की, निश्चितच वंदना गुप्तेचं नाव प्रथम येणार आणि तो तिने मिळवलेला विजय आहे. पण म्हणून नवीन विद्या, नवीन आव्हान दुसऱ्या नटीने घ्यायचं नाही का?… मी म्हणतो, घ्यायचं कारण त्या सशक्त व्यक्तिरेखा आहेत. आणि तुलना का करायची आहे आपल्याला ?… प्रत्येक नटाची आपली आपली स्ट्रेंथ असते, क्वालिटी असते. आणि पूर्वींच्यांना नाकारून यांना घेतलंय असं नाहीय. समजा आईच्या भूमिकेत रोहिणीताई आहेत. त्यांना आपण ‘गांधी’ सिनेमापासून ते ‘चालबाज’पर्यंत आणि ‘अग्निपथ’पासून ते आजच्या टीव्ही मालिकांपर्यंत ओळखतोय. त्या ‘एन. एस. डी.’ शिकून आल्यात, त्यांनी आणि जयदेव हट्टंगडीनी मिळून अविष्कारसारख्या संस्थेत काम केलंय. त्या जेंव्हा यातली आईची भूमिका साकारतील तेंव्हा असं कुणी म्हणणार नाही कि, या जागी दुसरं कुणी हवं होतं. मुक्ता जेंव्हा यातला टेलिफोनचा सीन पुन्हा करेल तेंव्हा प्रेक्षकांत बसून वंदना पण हेच म्हणेल कि, “छान केलं हिनं !”
मुद्दा हा असतो की, त्या त्या नटांची आपली अशी एक सशक्तता असते. तेंव्हा मी, ती तुलनाच करत नाही. मी बघतो, भूमिका चांगल्या वठल्यात

 

प्रश्न : आता पुन्हा चारचौघी साकारताना दिग्दर्शक म्हणून काय आव्हानं हाताळावी लागली ?

उत्तर : मी गेली पस्तीस दिवस तालीम करतोय आणि यातल्या सगळ्या कलाकारांनी मला प्रचंड वेळ दिला. रोहिणीताई यावेळेला मोठ्या हिंदी सिनेमांमध्ये काम करतायत. त्या अनेक मालिकांमधूनही काम करतायत. तरीही त्या जेंव्हा रंगभूमीची तालीम करायला वेळ देतात तेंव्हा त्यांच्या त्या रंगभूमी प्रेमाचा मला आदर वाटतो. त्या ‘एन. एस. डी.’ शिकून आल्यात. मुक्ता बर्वे ‘ललित कला केंद्रा’तून आहे. कुणी काहीही न शिकता एकांकिका स्पर्धांतून आलंय, तर कुणी व्यावसायिक नाटक करून आलंय. अशी छान वेगळी टीम जमून आलीय. या क्षणाला रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, श्रेयस राजे, निनाद लिमये, आणि पार्थ केतकर अशी आमची सगळ्यांची छान चर्चा झाली. नाटकावर खूप काम झालं, अगदी शब्दा-शब्दावर, वाक्या-वाक्यावर, मजा आली करताना !… वेगळे लाईट्स , वेगळं नेपत्थ्य , वेगळं डिझाईन, सगळं वेगळं झालंय. अवकाश वेगळा झालाय !
आता असं झालाय की, मलाच ते जुनं नाटक विसरायला झालंय… आणि मला ते विसरलंहि पाहिजे

प्रश्न : आता थोडा नाटकाबद्दलचाच पण नाटकाबाहेरचा प्रश्न विचारतो. काळाच्या पुढचं नाटक म्हणून ३० वर्षांपूर्वी ज्या चारचौघी ची चर्चा झाली, पुढे तेच नाटक किंवा त्यातली पात्र घराघरात आली असं वाटतं का ?

उत्तर : काही प्रमाणात आलं असण्याची शक्यता आहे. हि उलटी प्रक्रिया आहे नं… समाजात जे घडत असतं त्याचं रिफ्लेक्शन म्हणून नाटककार लिहीत असतो. ते ‘मेक बिलीफ’ म्हणून आपण बघत असतो. ते जसच्या तसं पुन्हा कुणी एक्झिक्युट करेल की, नाही माहित नाही. पण एक लक्षात घ्या, चांगलं नाटक त्या विषयाचं चहुबाजुचं आकलन वाढवतं. तेंडुलकर म्हणायचे, “चांगलं नाटक तुमच्या आयुष्याची समजूत वाढवतं.”

असाच निर्णय बाहेर जाऊन कुणी घेतला की, नाही माहित नाही. पण पुढचा कुठला निर्णय घेताना आत्मबळ या नाटकाने दिलं असेल. चारचौघीतली ती बाई घटस्फोट घेते म्हणून मी घटस्फोट घेते असं म्हटलं नसेल कुणी… पण खंबीरपणे मत मांडताना शक्ती मिळाली असेल. चळवळ असते, नाटक असतं, पुस्तक असतं, विचार असतात, अग्रलेख असतो. त्या त्या वेळची समाजाची जी घुसळण असते, ती तुम्हाला ताकद देते. आणि ती ताकद घेऊन तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य जगायचं असतं. तशीच्या तशी कॉपी कुणी करत नाही.

या नाटकात अनेक छोटे छोटे प्रश्न आहेत न्यायव्यवस्थेविषयीचे, नातेसंबंधांविषयीचे. अनेक क्रायसिसचे पॉईंट आहेत आपल्या आयुष्यात की, आता मला निर्णय घ्यायचा आहे. ते निर्णय घेताना नाटकातल्या व्यक्तिरेखांनी जे आत्मबळ वापरलंय, ते निश्चितच तुम्हाला मिळेल एवढी शाश्वती मी देतो तुम्हाला. असं दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले.


हे ही वाचा – मराठीत प्रथमच सात मराठी चित्रपटांची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -