प्रेमाचं तर माहीत नाही, पण नंगानाच…; उर्फीचा नाव न घेता वाघांवर पलटवार

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. या ट्रोलर्सला उर्फी नेहमीच सडेतोड उत्तर देतान दिसते. याच कारणामुळे अलीकडच्याच काळात उर्फीच्या कपड्यांवरुन पोलिस तक्रार देखील करण्यात आली होती. दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांपासून भाजपा नेत्या चित्रा वाघ देखील उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन सतत संताप व्यक्त करत आहेत. शिवाय उर्फी देखील त्यांच्या विरोधाला सडेतोड उत्तर देत आहे.

मागील पाच दिवसांपासून सुरु असलेल्या चित्रा वाघ आणि उर्फीच्या वादाकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. “उर्फीचा नंगानाच महाराष्ट्रात चालू देणार नाही.” असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. आता यावर उर्फीने एका व्हिडीओद्वारे चित्रा वाघ यांना प्रतिक्रिया दिली आहे.

उर्फीने दिलं उत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

उर्फीचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात उर्फीला एकजण तुझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना तू काय सांगशील? असं विचारतो. त्यावर ती म्हणते की,”प्रेमाचे माहित नाही पण माझा नंगानाच असाच सुरु राहिल.” सध्या उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकजण तिला ट्रोल देखील करत आहे.


हेही वाचा :

चित्रा वाघ यांना ‘चित्रू’ म्हणत उर्फीने पुन्हा डिवचलं