‘लंडन मिसळ’चा झणझणीत तडका ; चित्रपटाचं पोस्टर रिलीज

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर सध्या सर्वत्र झळकत असून या पोस्टरमध्ये एक तरूणी तिच्या समोरील पुतळ्याला हाताने मिशी लावताना दिसत आहे. लवकरच लंडनमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे.

लंडन मिसळबाबत या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणतात की, “यापूर्वी सुद्धा मी चित्रपट आणि मालिका केल्या आहेत आणि बऱ्याच काळानंतर मी पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय.या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच सुभाष घई यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळत असल्याने ही माझ्यासाठी फार आनंदाची बाब आहे. या चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर मराठी प्रेक्षकांना आवडेल असा आशय देण्याचा प्रयत्न मी ‘लंडन मिसळ’मध्ये केला आहे.” जालिंदर यांनी या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून त्याला कॅप्शन दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jalindar Kumbhar (@jalindar.kumbhar)

एबी इंटरनॅशनल प्रस्तुत, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ यांच्या सहाय्याने लंडन मिसळ या चित्रपटाची निर्मिती अमित बसनेत,परी राणा, सुरेश गोविंदराय पै यांनी केली आहे.

 

 


हेही वाचा : संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाचे टीझर रिलीज