महाराष्ट्राच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर नव-नव्या मालिकांची मेजवानी सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच ‘# लय आवडतेस तू मला’ आणि ‘आई तुळजाभवानी’ या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. अशातच आता येत्या 25 नोव्हेंबरपासून ‘अशोक मा.मा.’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या नव्या मालिका सुरू होत आहेत. महाराष्ट्राच्या घराघरांत संध्याकाळी 7 वाजल्यापासून टिव्ही लावला जातो तो रात्रीपर्यंत सुरूच असतो. 25 नोव्हेंबरपासून ‘कलर्स मराठी’वरील आपल्या आवडत्या मालिकांमध्येही अनेक रंजक वळणे येणार आहेत. संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत तुम्हाला या रंगतदार मालिकांमध्ये नवं आव्हान, नवी यारी, नवा धमाका आणि नवा स्वॅग पाहायला मिळणार आहे.
‘इंद्रायणी’ मालिकेत इंदू पुढे नवं आव्हान उभं राहणार आहे. मुक्ता बर्वेच्या एन्ट्रीनंतर मालिकेत एक भन्नाट ट्रॅक पाहायला मिळेल. इंदू आणि फँट्या गँगच्या आयुष्यात आलेली ती व्यक्ती कोण आहे? हे गूढ ते मिळून कसं सोडवतील ? या नव्या आव्हानाला ते कसे सामोरे जातील? याची प्रेक्षकांना आता आतुरता आहे. ‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेत सरकार आता हळूहळू सानिकाच्या प्रेमात पडू लागला आहे. अशातच आता कळशीचा छावा सरकार साखरगावच्या सानिकाचा बॉडीगार्ड बनून सरकार साखरगावात एन्ट्री करणार आहे. सरकारचा कूल अंदाज मालिकाप्रेमींची मने जिंकून घेईल. या सगळ्यात कशी होणार सरकारची सानिका याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे.
‘अशोक मा.मा.’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या नव्या मालिकाही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. ‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लाडके मा.मा नवा धमाका घेऊन येणार आहेत. तर दुसरीकडे ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेतील नवी यारी पाहायलाही प्रेक्षक उत्सुक आहेत. तुमच्या या सर्व आवडत्या मालिका 25 नोव्हेंबरपासून संध्याकाळी 7 वाजता आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर नक्की पाहा.
हेही वाचा : Reshma Shinde : ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदे अडकणार लग्नबंधनात
Edited By : Prachi Manjrekar