घरमनोरंजनदिवंगत अभियंता जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर चित्रपट; अक्षय कुमार मुख्य भूमिकेत

दिवंगत अभियंता जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर चित्रपट; अक्षय कुमार मुख्य भूमिकेत

Subscribe

जसवंत सिंग गिल यांनी 1989 मध्ये कोळश्याच्या खाणीत अडकलेल्या 65 कामगारांना अत्यंत कठीण परिस्थितीत वाचवले होते.

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) लवकरच प्रेक्षकांसमोर एका भारतीय नायकाचे शौर्य सादर करणार आहे. चित्रपटाची टीम या आगामी चित्रपटामार्फत अभियंता जसवंत सिंग गिल यांची खरी जीवनकहाणी मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाली आहे. जसवंत सिंग गिल यांनी 1989 मध्ये कोळश्याच्या खाणीत अडकलेल्या 65 कामगारांना अत्यंत कठीण परिस्थितीत वाचवले होते.

भारत सरकारचे केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर स्वर्गीय जयवंत सिंग गिल (jaswant singh gill) यांचे स्मरण करत ट्विट केले आहे. तसेच, मोठ्या पडद्यावर एवढ्या मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने अभिनेता अक्षय कुमार सुद्धा भारावून गेला आहे. अक्षय कुमारने त्याचा आनंद ट्विटरवरून त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यावेळी अक्षय म्हणाला, “या कथेसारखी दुसरी कथा नाही!”. अक्षयला या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते सुद्धा उत्सुक आहेत.

- Advertisement -

दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शन टिन्नू सुरेश देसाई करणार असून, यांनी यापूर्वी अक्षय कुमारसोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘रुस्तम’मध्ये काम केले आहे.

पूजा एंटरटेनमेंट ही, निर्माते वाशू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सर्वात मोठे आणि अग्रणी चित्रपट निर्मिती संस्था आहे. या प्रोडक्शन हाऊसने या आधी ‘कुली नंबर 1’, ‘बीवी नंबर 1’, ‘रेहना है तेरे दिल में ‘, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘फालतू’, ‘जवानी जानेमन’ यांसारखे मनोरंजनाने भरपूर असे चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर केले आहेत.

- Advertisement -

अक्षय कुमार अभिनीत आणि पूजा एंटरटेनमेंटद्वारा निर्मित हा अनटायटल्ड रिअल लाइफ रेस्क्यू ड्रामा हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हे ही वाचा – 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -