घरमनोरंजनऑस्कर 2023 मध्ये ‘नाटू नाटू’गाण्याचा होणार लाइव्ह परफॉर्मन्स

ऑस्कर 2023 मध्ये ‘नाटू नाटू’गाण्याचा होणार लाइव्ह परफॉर्मन्स

Subscribe

साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा RRR चित्रपट दिवसेंदिवस नवीन रेकॉर्ड बनवत आहे. या चित्रपटाला फक्त भारतीय प्रेक्षकांचीच नव्हे तर संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवला होता. त्यानंतर आता या गाण्याला ऑस्कर 2023 साठी देखील नामांकन मिळालेलं आहे. दरम्यान, आता या पुरस्काराशी संबंधित एक नवीन अपडेट समोर येते आहे. या ऑस्करमध्ये राहूल सिपलीगंज आणि काल भैरव परफॉर्म करताना दिसणार आहेत.

12 मार्चला पार पडणार ऑस्कर 2023

12 मार्चला होणाऱ्या ऑस्कर 2023 मध्ये या गाण्याचे गायक राहुल सिपलीगंज आणि काल भैरव लाईव्ह परफॉर्म करणार आहेत. या गाण्याचे संगीत एमएम कीरावानी यांनी दिले आहे. हे गाणे रिहाना, लेडी गागा, मित्स्की, डेव्हिड बायर्न आणि डायन वॉरन यांच्या विरुद्ध ‘बेस्ट ओरिजिनल सॉन्ग’ श्रेणीत असेल.

- Advertisement -

Oscars 2023 nominations: RRR song Naatu Naatu bags a nom in Best Original  Song category | Entertainment News,The Indian Express

‘RRR’ चित्रपट एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण आदिवासी नेते कोमाराम भीम आणि क्रांतिकारक अल्लुरी सीता रामा राजू यांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाद्वारे आलिया भट्टने टॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय अजय देवगण, श्रिया सरन, समुथिरकणी, रे स्टीव्हन्सन, मकरंद देशपांडे आणि ऑलिव्हिया मॉरिस या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत.


हेही वाचा :

अनन्या पांडेच्या आगामी थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -