घरमनोरंजनश्रेया घोषालच्या घरी झाले नव्या पाहुण्याचे आगमन,श्रेयाने दिला गोंडस मुलाला जन्म

श्रेया घोषालच्या घरी झाले नव्या पाहुण्याचे आगमन,श्रेयाने दिला गोंडस मुलाला जन्म

Subscribe

श्रेयाने चाहत्यांबरोबर ही गूड न्यूज शेअर केली आहे. पोस्ट मध्ये श्रेयाने लिहलं आहे की," देवाने आज दुपारी आम्हाला एका अनमोल मुलाचा आशीर्वाद दिला आहे.

आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकणारी बॉलिवूडची लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. श्रेयाच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे श्रेयाने एका गोंडस बाळाला जन्मदिला असून श्रेया आता आई झाली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करुन श्रेयाने चाहत्यांबरोबर ही गूड न्यूज शेअर केली आहे. पोस्ट मध्ये श्रेयाने लिहलं आहे की,” देवाने आज दुपारी आम्हाला एका अनमोल मुलाचा आशीर्वाद दिला आहे. हे खूपच भावनिक आहे. असं भावनिक कधीच वाटलं नव्हतं. शिलादित्य आणि माझे कुटुंबिय या अंदाची मजा लुटत आहे. आनंद साजरा करत आहेत. तुम्हा सगळ्यांचे खू खू आभार” श्रेयाच्या या पोस्ट वर तिच्या चाहत्यांनी तसेच इतर कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by shreyaghoshal (@shreyaghoshal)

- Advertisement -

२०१५ मध्ये श्रेया घोषाल प्रियकर शिलादित्यासोबत विवाहबंधनात अडकली होती. दूरदर्शनवरील ‘सा रे ग म प’ या गायनस्पर्धेत श्रेया विजेती झाली होती. त्यानंतर तिच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. देवदास या चित्रपटात तिने पहिल्यांदा पाश्वगायन केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार व फिल्मफअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. श्रेयाने आजवर जवळपास १४ भाषांमध्ये गाणी गायली आहेत. वयाच्या चोथ्या वर्षापासून श्रेयाने संगीताचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. पार्श्वगायनासोबतच ती काही रिअॅलिटी शोज मध्येही परीक्षक म्हणून दिसली आहे.

 

- Advertisement -

हे हि वाचा – मलायका सोबतचे नातं काय? अर्जुन कपूरने पहिल्यांदाच केला खुलासा !

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -