घरमनोरंजन‘व्हॅलेन्टाइन सप्ताहा’चे औचित्य साधत ‘फायटर’ चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शित

‘व्हॅलेन्टाइन सप्ताहा’चे औचित्य साधत ‘फायटर’ चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शित

Subscribe

सिद्धार्थ आनंद यांच्या ‘फायटर’ या चित्रपटामुळे प्रेक्षकांमध्ये रोमांचकारी हवाई साहसाचा आणि देशभक्तीचा जोश संचारला आहे, असा जोश सिनेरसिकांनी मोठ्या पडद्यावर यापूर्वी कधीही अनुभवलेला नव्हता. हा चित्रपट सध्या सिनेगृहांत झळकला असून बॉक्स ऑफिसवरही उत्तम कामगिरी बजावत आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिका हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांनी वठवल्या आहेत. हृतिक रोशनने या चित्रपटात स्क्वाड्रन लीडर शमशेर ‘पॅटी’ पठानियाची भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

या चित्रपटाला सर्वत्र रसिकांचे भरभरून प्रेम मिळत आहे, त्यामुळे निर्मात्यांनी या चित्रपटात ‘बेकार दिल’ हे नवे गाणे जोडले असून ते आजपासूनच चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील ही एक मोठी घटना आहे, याचे कारण असे काहीतरी करण्याचा प्रयत्न बऱ्याच अवधीनंतर होत आहे. या गाण्यात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्यातील सौहार्दपूर्ण आणि प्रेमाचे नाते दिसून येते, जे या ‘व्हॅलेंटाइन सप्ताहा’त सिनेरसिकांचे आकर्षण वाढवण्याकरता पुरेसे आहे. यांतून चित्रपटाच्या निर्मात्यांचा अनोखा विचार दिसून येतो.

- Advertisement -

हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत असताना, ‘फायटर’ या चित्रपटाला सिनेरसिकांचा मिळणारा प्रतिसाद अधिक उंचावण्याकरता उचलण्यात आलेले हे एक मोठे पाऊल आहे. या तिसऱ्या आठवड्यात ‘फायटर’सारख्या आगळ्यावेगळ्या चित्रपटात नवे गाणे जोडण्याची अनोखी कल्पना प्रेक्षकांचा उत्साह कमालीचा वाढवणारी आहे.


हेही वाचा :

Saif and Kareena : ‘आम्ही मुलांना जन्म देतो, पण…सैफ अली खानचं विधान चर्चेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -