ए आर रेहमान हे संगीत जगतातील एक मोठं नाव आहे. ऑस्कर पुरस्कार पटकावलेल्या रेहमानने परदेशातही स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. त्याच्या कार्यक्रमांची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. 10 सप्टेंबर रोजी चेन्नई येथे झालेल्या त्याच्या लाइव्ह कार्यक्रमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, परंतु तेथे झालेल्या प्रंचड गर्दीने चाहत्यांची निराशा झाली. सोशल मीडियावर लोक कार्यक्रमाच्या आयोजकांवर तसेच रेहमानवर टीका करत आहेत. (A R Concert A R Rehman s program Women were molested while many were suffocated by the crowd Marakkuma Nenjam Chennai )
लोकांनी आपला राग व्यक्त केला
रेहमाननचा रविवारी 10 सप्टेंबर रोजी चेन्नईमध्ये लाइव्ह शो होता, ज्याची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. मात्र, जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा चाहत्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. कार्यक्रमातील सहभागींनी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करून कार्यक्रमाच्या ढिसाळ व्यवस्थापनाविरोधात संताप व्यक्त केला. त्यांना तेथे भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागल्याचे कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांनी सांगितले.
पॅनीक अटॅकचा सामना करावा लागला
चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती अनुभवण्यापासून ते कार्यक्रमात पोहोचू न शकण्यापर्यंत अनेकांनी आयोजकांना जबाबदार धरले आहे. काहींनी सांगितले की कार्यक्रमाचा आवाज खूपच कमी होता आणि जे स्टेजपासून दूर होते त्यांना ऐकूदेखील येत नव्हते. गर्दीमुळे अनेकांना पॅनीक अटॅकचा सामना करावा लागला. काहींनी तर रेहमानचे सर्वात मोठे चाहते असूनही ते कधीही त्याच्या मैफिलीत सहभागी होणार नाहीत, अशी शपथही घेतली आहे.
रविवारी चेन्नईच्या पनईयूर येथील आदित्यराम पॅलेसमध्ये ए आर रेहमानचा कॉन्सर्ट झाला. या कार्यक्रमात व्यसस्थापन अतिशय खराब असल्याचा आरोप चाहत्यांकडून करण्यात आला आहे. तर इतकी गर्दी होती की या कार्यक्रमात अनेक महिलांचा कथितपणे विनयभंग करण्यात आला, मुले जखमी झाली असा आरोप करणय्यात येत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करून नाराजी व्यक्त केली आहे.
रविवारी ‘माराकुमा नेंजाम’ नावाच्या कार्यक्रमात सुमारे 50 हजार लोक सहभागी झाले होते. पण अनेकांनी सोशल मीडियावर एआर रेहमानवर निशाणा साधला आहे. हा कार्यक्रम 12 ऑगस्टला होणार होता. पण खराब हवामानामुळे जवळपास महिनाभर ते पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे लोकांमध्ये आधीपासूनच नाराजी होती. दुसरीकडे रविवारी झालेल्या प्रकारामुळे लोक आणखीनच संतापले आहेत.
(हेही वाचा: जवानने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत गाठला 350 कोटींचा टप्पा )